नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

By : Sangharshkranti Team ,2025-11-07

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .४ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी,
राज्यात सर्वत्र निवडणुकांच्या चर्चेला जोर चढला असताना श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूकही आता हळूहळू केंद्रस्थानी येऊ लागली आहे. लागलीच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत असून, नगराध्यक्षपदी कोण? या प्रश्नावर गावागावात, चौकाचौकात चर्चेचा विषय रंगत चालला आहे.
जुने अनुभवी चेहरे आणि नव्या दमाचे उत्साही उमेदवार अशी स्पर्धा रंगताना दिसत असताना, याच पार्श्वभूमीवर एक नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते.
नगरपालिकेच्या राजकारणात हे नाव नवीन असले तरी पाचपुते घराण्याच्या राजकीय वारशाशी जोडले गेल्यामुळे या नावाभोवती राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरु झाली आहे.
सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते या राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सूनबाई आणि आमदार ॲड.विक्रमसिंह पाचपुते यांच्या भावजय आहेत. त्यामुळे पाचपुते परिवारातील हे संभाव्य उमेदवार असलेले पहिलेच नाव असल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेत जर पाचपुते घराण्याने उमेदवारी केली तर निवडणुकीचा तोल एका क्षणात बदलू शकतो,अशी कार्यकर्त्यांमधील चर्चा रंगली आहे.
राजकारणात पाचपुते परिवाराने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी जवळीक ठेवली आहे. कार्यकर्त्यांना सन्मान, जनतेच्या अडचणींमध्ये तत्पर सहभाग आणि विकासाभिमुख भूमिका या गोष्टींमुळे या घराण्याचा जनतेत अजूनही विश्वास कायम आहे. त्यामुळेच सौ.इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर चर्चा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह दोन्ही दिसून येत आहेत.
या अगोदर पाचपुते घराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सातत्याने आपली ताकद दाखवली आहे. बहुतेक वेळा विजय मिळवत घराण्याने आपल्या जनाधाराचे वातावरण वाढलेले आहे.
जर यावेळी सौ. इंद्रायणी पाचपुते नगरपालिकेच्या रणांगणात उतरल्या, तर या परिवारातील सदस्य म्हणून त्या नगरपालिकेची निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरतील.
एकूणच, श्रीगोंद्यातील राजकारण सध्या सस्पेन्स मोडमध्ये आहे.
पाचपुते कुटुंबाने जर सौ.प्रतापसिंह इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर श्रीगोंदा नगरपालिकेची लढत नक्कीच रंगतदार आणि ऐतिहासिक ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांचा आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!