By : Sangharshkranti Team ,2026-08-24
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 24 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ओंकार ग्रुपच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन, शेतकरी कामगार सरचिटणीस तथा माजी आमदार जयंतभाई पाटील तसेच साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य डॉ. संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ओंकार ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, रेखाताई बोत्रेपाटील व गौरीताई बोत्रेपाटील यांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवरांनी ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “शेतकरी कुटुंबातून आलेल्या बाबुराव बोत्रेपाटील यांनी अत्यंत अल्प कालावधीत साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ओंकार ग्रुपचे मोठे साम्राज्य उभे केले आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. साखर उद्योगासोबतच आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विस्तार, शेतकरी हित आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून ओंकार ग्रुपने केलेल्या वाटचालीचे मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी ओंकार ग्रुपमधील सर्व कारखान्यांचे जनरल मॅनेजर, खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छांमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
ओंकार ग्रुपच्या विस्ताराच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा हा सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!