By : Sangharshkranti Team ,2026-10-30
श्रीगोंदा | संघर्षनामा वृत्तसेवा
दि .२९ ऑक्टोबर २०२६
उज्वलाताई उल्हारे ,डाडर यांजकडून
श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा या महत्त्वपूर्ण विषयांवर आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी पुढाकार घेत टंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा येथे पार पडलेल्या तिसऱ्या टंचाई आढावा बैठकीत शेतीसाठी कुकडी व घोड कालव्याचे आवर्तन, कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे आणि चारा पिकांसाठी मका बियाणे उपलब्ध करून देणे यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय व पाठपुराव्याची दिशा निश्चित करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून ५ नोव्हेंबरपासून कुकडीचे, तर १० नोव्हेंबरपासून घोडचे आवर्तन शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. तसेच १२ नोव्हेंबरपर्यंत तलावांवरील खंडित कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, चारा पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मका बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयांमुळे पाणी आणि चाऱ्याच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार विक्रमदादा पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत पाण्याची परिस्थिती काहीशी चांगली असली, तरी आगामी काळातील चारा टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्याला चारा पुरविण्याची क्षमता श्रीगोंदा तालुक्यात असून, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून मका व इतर चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले..
फळबागा जगवा, पाण्याचा काटकसरीने वापर करा! :-तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य आणि मर्यादित वापर करावा. विशेषतः फळबागा जगविण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आगामी काळातील चारा टंचाई टाळण्यासाठी चारा पिकांची लागवड वाढवावी, असे आवाहनही आमदार पाचपुते यांनी केले.
या बैठकीस कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, जलजीवन मिशनचे गणेश भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाणी, वीज आणि चाऱ्याच्या प्रश्नांना एकाच बैठकीत प्राधान्य देत आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी दिशा दिली असून, आगामी काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत वेगाने होते, याकडे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट
कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा! :-शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तलावांवरील कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. चारा पिके आणि फळबागा जगविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत लेखी आदेश अपेक्षित असून, १२ नोव्हेंबरपर्यंत कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली
माहीजळगावच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा भक्तीमय सोहळ्यात अन्नदान उपक्रमाचे आयोजन
शेतकऱ्यांना दिलासा ! आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या टंचाई आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..
अरिहंत पतसंस्थेंकडून ८०० ठेवीदारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप!
हिरडगाव येथील गौरी शुगरचा ४था गाळप हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन , गाळप हंगामाचा शुभारंभ!
श्री मच्छिंद्रनाथ गडावरील दसऱ्या मेळाव्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
ओंकार शुगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! SISSTA कडून ‘Best Factory Award’ने ओंकार शुगरचा गौरव..
प्रा.श्रीकांत तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ पदवी!
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!