By : Sangharshkranti Team ,2026-08-21
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 21ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या श्रीगोंदा तालुका महिला आघाडीच्या मा. तालुकाध्यक्षा सुनीताताई मच्छिंद्र (एम.डी.) शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पक्षाने सोपविलेली नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना सुनीताताई शिंदे म्हणाल्या की, भाजपाची विचारधारा, पक्षसंघटनेची रणनीती आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रभावीपणे काम करणार आहोत. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच महिला संघटन वाढविणे, महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्षम करणे तसेच त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याला प्राधान्य राहील.
महिलांच्या विविध समस्या, सामाजिक प्रश्न आणि न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि न्यायिक रणनीतीच्या माध्यमातून पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनीताताई शिंदे यांच्या निवडीबद्दल मा. मंत्री बबनराव पाचपुते, परिक्रमाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभाताई पाचपुते, आमदार विक्रमदादा पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते तसेच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
श्रीगोंदा नगर परिषदेत नगराध्यक्षा म्हणून काम करताना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर दक्षिण अहिल्यानगर महिला आघाडीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून त्या महिला संघटनेला अधिक बळकटी देत पक्षसंघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!