By : Sangharshkranti Team ,2026-08-21
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 21 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
साखर उद्योगाच्या विकासात उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ओंकार शुगर ग्रुपला ‘Industry Excellence Award’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
The Sugar Technologists’ Association of India (STAI), नवी दिल्ली यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. STAI च्या ८४व्या वार्षिक अधिवेशन व International Sugar Expo 2026 अंतर्गत दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान गोवा येथील Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ओंकार शुगर ग्रुपला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने हा मानाचा पुरस्कार ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी स्वीकारला. यावेळी STAI चे अध्यक्ष, SISSTA चे अध्यक्ष तसेच साखर उद्योगाशी संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कारामध्ये साखर उद्योगाच्या विकासातील व्यावसायिक उत्कृष्टता व उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. ओंकार शुगर ग्रुपकडून साखर उद्योगासोबतच इथेनॉल, बायोएनर्जी, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि उद्योगविस्तार यांना दिले जाणारे प्राधान्य या यशामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे.
या अधिवेशनास देशातील साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साखर उद्योगातील ज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील संधी यावर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात विचारविनिमय करण्यात आला.
ओंकार शुगर ग्रुपला मिळालेला हा पुरस्कार समूहाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल असून, भविष्यात अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत साखर उद्योग उभारण्याच्या प्रवासाला निश्चितच नवी प्रेरणा देणारा आहे.
चौकट - या उल्लेखनीय सन्मानाबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, संचालक ओमराजे बोत्रेपाटील तसेच समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!