By : Sangharshkranti Team ,2026-08-21
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 21ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्याने भावूक झालेल्या आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी आपल्या अंतर्मनातील भावना व्यक्त करताना नेतृत्वाच्या विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या शब्दांत पदाची अपेक्षा नसून नेतृत्वाकडून मिळालेल्या विश्वासाला सर्वाधिक महत्त्व असल्याची भावना प्रकर्षाने उमटली.
“कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे राजकीय जीवनातही नेतृत्वाचे कौतुकाचे दोन शब्द, विश्वासाची एक थाप आणि आशीर्वादाची नजर कार्यकर्त्याला पुढच्या मोठ्या प्रवासासाठी नवी ऊर्जा देऊन जाते,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. नेतृत्वाची ही पाठ थोपटणारी नजर कार्यकर्त्याच्या कष्टांना नवी दिशा देत असते, अशीच भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाली.
“भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी अर्थात रवीदादा चव्हाण साहेबांनी माझ्या आई-वडिलांसमोर, उपस्थित स्थानिक नेते, पदाधिकारी आणि जनसमुदायासमोर माझ्या विधानसभेतील भाषणाचे, मुद्दे मांडण्याच्या पद्धतीचे आणि आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले. पक्षासाठी राज्यपातळीवर काम करण्याची संधी आपण सर्वांनी मला द्यावी, असे त्यांनी सांगितले. साहेबांचे हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठे आहेत. हा विश्वासच माझा आशीर्वाद, हीच माझी ऊर्जा आणि पुढील वाटचालीची प्रेरणा आहे,” असे आमदार पाचपुते यांनी सांगितले.
“माझ्यावर व्यक्त झालेला हा विश्वास मी केवळ कौतुक म्हणून न पाहता एक जबाबदारी म्हणून स्वीकारतो. आई-वडिलांसमोर, माझ्या सहकाऱ्यांसमोर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेतृत्वाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे. पक्षाने आणि नेतृत्वाने जी संधी दिली, तिचे प्रामाणिकपणे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
नेतृत्वाचा विश्वास ठरतोय नव्या वाटचालीची ऊर्जा : आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेला विश्वास महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभा पातळीवर मतदारसंघातील विविध प्रश्न आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणारे आमदार म्हणून पाचपुते यांची ओळख निर्माण होत असताना, आता पक्षाच्या राज्यपातळीवरील कामात त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता या वक्तव्यातून अधोरेखित झाली आहे.
काष्टीतील या सदिच्छा भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्षांकडून झालेल्या कौतुकानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. “विक्रमदादा पाचपुते यांना राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी मिळावी,” अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
चौकट- पाचपुते परिवारासाठी अभिमानाचा क्षण :-राजकारणातील कोणतेही पद हे अंतिम ध्येय नसून नेतृत्वाचा विश्वास आणि जनतेची सेवा हीच खरी ताकद असल्याचे आमदार पाचपुते यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले. आई-वडिलांसमोर प्रदेशाध्यक्षांनी केलेले कौतुक आणि व्यक्त केलेला विश्वास हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला.
“नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अधिक जोमाने काम करायचे आहे. पक्षाची विचारधारा, जनतेचे प्रश्न आणि मतदारसंघाचा विकास यांना प्राधान्य देत पुढील वाटचाल करणार,” अशी भावना आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासह भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, आमदार विक्रमदादा पाचपुते यांना राज्यस्तरावर कोणती जबाबदारी मिळणार, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!