By : Sangharshkranti Team ,2026-08-21
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 21 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या पाच राजमाता जिजाऊ एसटी बसेसचे विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले. परिक्रमा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा तथा मा.जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांच्या हस्ते फीत कापून या नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बससेवा ही दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शासकीय कामे तसेच विविध कारणांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक एसटी बससेवेचा वापर करतात. त्यामुळे श्रीगोंदा आगारात नव्या आणि अद्ययावत पाच बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या नवीन बसेसमुळे तालुक्यातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विशेषतः माता-भगिनींचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बसेसचे आगमन महत्त्वाचे मानले जात आहे.
लोकार्पण प्रसंगी डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांनी नवीन बसेसच्या सेवेमुळे श्रीगोंदा आगाराच्या प्रवासी सेवेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक आधुनिक व सुरक्षित बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा ,नगरसेवक, नगरसेविका,एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, आगारातील कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच प्रवासी उपस्थित होते. नवीन बसेसच्या लोकार्पणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
चौकट - श्रीगोंदा आगाराच्या ताफ्यात दाखल झालेल्या या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमुळे प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाला नवी दिशा मिळणार असून, एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास! या भावनेला अधिक बळ मिळणार आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!