महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५ (Sub Registrar व STI) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर " />

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

By : Sangharshkranti Team ,2026-08-19

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 19 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५ (Sub Registrar व STI) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर स्पर्धा परीक्षार्थींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, तब्बल ७६ उमेदवारांची Sub Registrar आणि STI या दोन्ही पदांवर निवड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी एका पदाचा स्वीकार केल्यानंतर दुसऱ्या पदाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः STI पदांसाठी ‘ऑप्टिंग आउट’ची प्रक्रिया उपलब्ध नसल्यामुळे दुहेरी निवड झालेल्या उमेदवारांच्या जागा पुढील पात्र उमेदवारांना उपलब्ध होण्याचा मार्ग सध्या स्पष्ट नसल्याने अनेक स्पर्धा परीक्षार्थींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका बाजूला निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे पद मिळण्याचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला उपलब्ध पदांचा पूर्ण क्षमतेने उपयोग होऊन पात्र उमेदवारांना संधी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन हा महत्त्वपूर्ण विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

दुहेरी निवड झालेल्या उमेदवारांच्या पसंतीक्रमाचा विचार करून रिक्त राहणाऱ्या STI पदांवर इतर पात्र उमेदवारांना संधी देत संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करावा, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. विद्यार्थ्यांच्या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करून उपलब्ध पदे रिक्त न ठेवता गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि उपलब्ध पदांचा योग्य विनियोग होण्याचा मुद्दा आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी ठामपणे मांडला. ७६ STI पदे रिक्त राहिल्यास अनेक पात्र आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. मर्यादित जागांसाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करीत असताना उपलब्ध जागा केवळ तांत्रिक कारणामुळे रिक्त राहू नयेत, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.

या मागणीमुळे केवळ एका परीक्षेच्या निकालाचा प्रश्न नसून, गुणवत्तेच्या आधारे पुढील पात्र उमेदवारांना संधी मिळण्याचा आणि शासनाच्या मंजूर पदांचा प्रभावी वापर होण्याचा विषय पुढे आला आहे. त्यामुळे पसंतीक्रमाचा योग्य विचार करून सुधारित अथवा नव्याने निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राबविल्यास दुहेरी निवडीमुळे निर्माण होणारी पदांची रिक्तता टाळता येऊ शकते, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षार्थी व्यक्त करीत आहेत.

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या मागणीची मुख्यमंत्री यांनी सकारात्मक दखल घेतली असून, या विषयावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५च्या उमेदवारांचे तसेच आगामी संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

चौकट - शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्यास दुहेरी निवड झालेल्या उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार पदांचे समायोजन होऊन रिक्त राहणाऱ्या STI जागांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परिणामी गुणवत्ता यादीतील पुढील पात्र उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी पुढाकार घेतल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी हितासाठी हा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्याच्या तातडीच्या निर्णयासाठी पाठपुरावा केल्याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

 

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!