दि. 20 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
“आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आ" />
By : Sangharshkranti Team ,2026-08-20 संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा दि. 20 ऑगस्ट 2026 (उज्वला उल्हारे) “आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे श्रीगोंदकरांनी विक्रमला महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ‘सुट्टी’ द्यावी,” असे थेट आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमदार विक्रमदादा पाचपुते यांना आगामी काळात पक्षाकडून राज्यस्तरावर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. आमदार विक्रम पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्षांच्या या स्पष्ट आणि सूचक वक्तव्याने बैठकीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या पाचपुते यांची भूमिका आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या व्यापक पटावर नेण्याचा पक्षाचा विचार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळाले. प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण म्हणाले, विक्रम केवळ प्रश्न मांडत नाहीत, तर त्याचा पाठपुरावा करतात” विक्रम पाचपुते यांचे वय कमी असून ते अत्यंत तरुण आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रवास करून जनतेशी थेट संपर्क साधण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एखादा प्रश्न समोर आल्यानंतर तो केवळ मांडून थांबणे ही त्यांची कार्यपद्धती नाही. संबंधित प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची विशेष कार्यशैली आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता पाचपुते यांच्यात असल्याचेही चव्हाण यांनी अधोरेखित केले. अभ्यास, वक्तृत्व आणि जनसंपर्काची सांगड “विक्रम हा केवळ आमदार म्हणून नव्हे, तर एक अभ्यासू आणि प्रभावी कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या वक्तृत्वात मुद्दा आहे, अभ्यासात खोली आहे आणि प्रश्नांच्या पाठपुराव्यात सातत्य आहे. महाराष्ट्राला अशाच तरुण आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे,” अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पाचपुते यांच्या नेतृत्वगुणांचा राज्याच्या व्यापक राजकारणासाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण यांनी श्रीगोंदकरांनाच भावनिक साद घातली. “श्रीगोंदकरांनो, विक्रमला महाराष्ट्रासाठी द्या. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्यांना तुम्ही सुट्टी द्या,” या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश निर्माण झाला. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाची चर्चा आता श्रीगोंदा मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही सुरू झाली आहे. तरुण नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, व्यापक जनसंपर्क आणि जनतेच्या प्रश्नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा या गुणांच्या जोरावर पाचपुते यांना पक्षाकडून भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याकडे आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संकेत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांची पुढील राजकीय वाटचाल केवळ श्रीगोंद्यापुरती राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना नवी भूमिका मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चौकट : “विक्रमला महाराष्ट्रासाठी द्या!” प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तरुण, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व म्हणून आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे राज्याच्या राजकारणातील संभाव्य नेतृत्व म्हणून पाहिले जात असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या आवाहनामुळे पाचपुते यांना आगामी काळात पक्षाकडून कोणती जबाबदारी मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!