श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील सिंचन क्षेत्रात असलेल्या लिंपणगावच्या शेतकऱ्यांना " />

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

By : Sangharshkranti Team ,2026-08-21

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 21 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

 श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील सिंचन क्षेत्रात असलेल्या लिंपणगावच्या शेतकऱ्यांना अद्यापही कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. सध्या 132 मायनर मधून श्रीगोंदा च शेतकऱ्यांना आवर्तन सुरू आहे. दरम्यान कुकडी कालव्या अंतर्गत असणाऱ्या 132 मायनर मधून श्रीगोंद्याच्या शेतकऱ्यांना कुकडीचे ओव्हर फ्लो चे पाणी जवळपास दहा ते बारा दिवसापासून सुरू आहे. असे असताना लिंपणगावच्या शेतकऱ्यांना मात्र या 132 मायनर मधून अद्यापही कुकडीच्या पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. चोराची वाडी वेळू या गावानंतर आता बाबुर्डी आणि वांगदरी चारीला सध्या पाणी सुरू आहे. लिंपणगावकरांना मात्र जाणीवपूर्वक पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.

 या संदर्भात लिंपणगावच्या शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी मिळावे म्हणून कुकडीचे कार्यकारी अभियंता व विसापूर जलसिंचन चे उपविभागीय अधिकारी  बोरसे यांना रीतसर निवेदन देऊन शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरले. परंतु अधिकारी मात्र लिंपणगावकरांना पाणी सोडण्यासाठी सकारात्मक दिसून येत नाहीत. असे वंचित शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

    शेतकरी प्रवीण कुरुमकर व अशोक वाल्हेकर यांनी या कुकडीच्या पाण्यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की, कुकडी कालव्याअंतर्गत असणाऱ्या 132 मायनर मधून लिंपणगावच्या शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी सोडले जाते, परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून लिंपणगावच्या शेतकऱ्यांवर पाणी वाटपात अन्याय केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठे नुकसान होते असा दावा केला आहे. या चारी वरती संस्था स्थापन झाल्यापासून बळीराजा पाणी वापर संस्था व किसान पाणी वापर संस्था मार्फत शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी वाटप केले जात होते. या संस्थांच्या मागणीनंतरही कुकडीचे कालव्यातून पाणी सोडले जात नाही. हा अन्याय कशासाठी? असा सवाल शेतकरी प्रवीण कुरुमकर यांनी केला आहे. तर वंचित शेतकरी अशोक वाल्हेकर यावेळी बोलताना म्हणाले की 132 मायनर अंतर्गत लिंपणगावच्या चारीला 2019 -20 या सालामध्ये संस्थांकडे पाणी होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचे वाटप केले जात होते. त्यानंतर 20 -21 या वर्षांमध्ये जलसंपदा विभागाने कुकडीच्या पाण्याचे खाजगीकरण करत खाजगी व्यक्तीला टेंडर देऊन पाणी वाटप करण्यास परवानगी दिली. तेव्हांपासून खऱ्या अर्थाने लिंपणगावकरांना पाणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला. सदर खाजगी ठेकेदाराने या कालव्यांअंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे भरून घेण्यासाठी या कालव्याच्या पाण्याचा घोडेबाजार करत लिंपणगाव या टेलखालील शेतकऱ्यांना फक्त संबंधित ठेकेदाराने चारी ओली करून वारंवार पाणी बंद केले. या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना ज्ञात असताना देखील अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. असा आरोप अशोक वाल्हेकर यांनी केला आहे. चार वर्षात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला मात्र मागणी करूनही पाणी मिळाले नाही याउलट संबंधित ठेकेदाराने लिंपणगावच्या किसान पाणी वापर संस्था व बळीराजा पाणी वापर संस्थेच्या नावे लाखो रुपयाची थकीत पाणीपट्टी माथी दाखवली. त्या थकबाकीच्या नावे कुकडीचे कार्यकारी अभियंता व शाखा अधिकारी हे लिंपणगावच्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक आवर्तनापासून वंचित ठेवत आहेत. पाणी न मिळाल्यामुळे सध्या कमी पावसावर उभे असणारी खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत सुकून जात आहेत. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुकडीच्या अधिकाऱ्यांबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चौकोन -

वंचित शेतकऱ्यांनी साधला आमदार पाचपुतेशीं संवाद: कुकडीच्या पाण्यासंदर्भात लिंपणगावच्या शेतकऱ्यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची भेट घेऊन कुकडीच्या पाणी वाटपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या चार वर्षापासून लिंपणगावकरांवर आवर्तन कालावधीत अन्याय केला जातो याबाबत आपण तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना आवर्तनाबाबत सूचना द्यावी अन्यथा हाता तोंडाशी आलेली पिके जळून जातील अशी विनवणी लिंपणगावच्या शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली. यावेळी आमदार पाचपुते यांनी देखील तात्काळ कार्यकारी अभियंता यांना आवर्तन सोडण्यासंदर्भात तात्काळ सूचना केल्या. परंतु अद्यापही संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थांबा आणि पहा अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

 कुकडीचे कार्यकारी अभियंता श्री घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील थकबाकीचे कारण दाखवले परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मात्र आम्हाला चार वर्षापासून खाजगीकरण केलेल्या व्यक्तीकडून कुकडीचे पाणीच मिळाले नाही तर पाणीपट्टी भरायची कुठून असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. या 132 मधून चोराचीवाडी, व वेळेला कुकडीचे पाणी सोडले शेजारी लिंपणगाव मात्र अद्यापही पाण्यापासून वंचित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाणी न सोडल्यास आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल. असा इशारा शेतकरी प्रवीण कुरुमकर, अशोक वाल्हेकर, दीपक वाल्हेकर, भरत वाल्हेकर, अनिल वाल्हेकर, प्रशांत कुरुमकर, अर्जुन कुरुमकर, संतोष कुरुमकर आदींसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!