बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

By : Sangharshkranti Team ,2026-08-27

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 27 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

करमाळा : करमाळा येथील  जगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या पवित्र कार्याला भाविकांकडून सातत्याने आर्थिक सहकार्य मिळत आहे. याच भावनेतून  नारायण गणपत बोबे सर यांचे पुत्र  सुरज नारायण बोबे, रा. कळवा, ठाणे यांनी दि. २५ ऑगस्ट २०२६, मंगळवार रोजी मंदिर जतन-संवर्धनाच्या कामासाठी ५ हजार १ रुपयांची रोख देणगी अर्पण केली.

 सुरज बोबे यांनी ही देणगी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी सुपूर्द केली. यानिमित्ताने मंदिराचे पुजारी बाळासाहेब सोरटे व व्यवस्थापक अशोक गाठे यांच्या हस्ते  सुरज बोबे यांचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या संवर्धनासाठी बोबे परिवाराकडून सातत्याने होत असलेल्या योगदानाबद्दल मंदिर समितीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बोबे परिवाराचा सातत्यपूर्ण सहभाग

 नारायण बोबे सर व बोबे परिवार यांनी यापूर्वीही श्री कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनाच्या कामासाठी वेळोवेळी देणगी दिली आहे. त्यांचा देणगीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे—

दि. ६ नोव्हेंबर २०२४ - रु. २१,०००

दि. १२ एप्रिल २०२५ -  रु. ११,०००

दि. २३ डिसेंबर २०२५ - रु. ११,०००

दि. १९ एप्रिल २०२६ - रु. ११,०००

दि. १९ एप्रिल २०२६ - रु. १,०००

दि. २५ ऑगस्ट २०२६ - रु. ५,००१

अशा प्रकारे बोबे परिवाराकडून आजअखेर एकूण ६० हजार १ रुपयांची देणगी मंदिर जतन-संवर्धनाच्या कार्यासाठी प्राप्त झाली आहे.

पुरातन मंदिराच्या जतनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

श्री कमलादेवी मंदिर हे करमाळ्याच्या धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. मंदिराचे पुरातन स्वरूप आणि वास्तूवैभव जतन करून भावी पिढ्यांपर्यंत ही ऐतिहासिक परंपरा पोहोचविण्यासाठी जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामाला भाविक, भक्त, मानकरी, सेवेकरी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे बळ मिळत आहे.

बोबे परिवाराने सातत्याने दिलेल्या देणगीमुळे मंदिर जतन-संवर्धनाच्या कार्यात लोकसहभागाची भावना अधिक दृढ होत असून, त्यांच्या योगदानाचे मंदिर समितीच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.

चौकट- भाविकांना देणगीचे आवाहन मंदिर जतन-संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असल्याने अधिकाधिक भाविक व दानशूर व्यक्तींनी या पवित्र कार्यासाठी सढळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिरासाठी ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.

बोबे परिवाराच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मंदिर समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

देणगी व अधिक माहितीसाठी संपर्क :

अशोक गाठे, व्यवस्थापक

मो. ९४०४७०८९२४

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!