By : Sangharshkranti Team ,2026-08-21
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 21ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
करमाळा श्रीदेवीचा माळ येथे श्री जगदंबा कमलादेवी मंदिरामध्ये आज सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे भव्य आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास सुमारे दोन हजार महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले. आई जगदंबा कमलादेवीच्या चरणी नतमस्तक होत महिला भाविकांनी विश्वकल्याण, सुख-समृद्धी आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तीचा आणि अध्यात्माचा जागर पाहायला मिळाला. एकसुरात घुमणाऱ्या दुर्गा सप्तशतीच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो महिला भाविकांच्या सामूहिक पठणामुळे मंदिर परिसराला जणू शक्ती आणि श्रद्धेच्या जागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे सचिव अनिल पाटील व ॲड. लता पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यास मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त सुशील राठोड, डॉ. रोहन पाटील, राजेंद्र वाशिंबेकर तसेच मंदिराचे पुरोहित श्याम पुराणीक, पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, संजय कदम, सौ. कदम, वीर सर, वीर मॅडम यांच्यासह मंदिरातील पुजारी, सेवेकरी व मानकरी उपस्थित होते.
तसेच श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले. मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या भव्य-दिव्य धार्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
चौकट :
दोन हजार महिला भाविकांचा सामूहिक सहभाग
श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात आयोजित सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेत सुमारे दोन हजार महिला भाविकांनी सहभाग घेतला. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!