By : Sangharshkranti Team ,2026-08-27
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 27 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
करमाळा : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तोच निधी धार्मिक व ऐतिहासिक वास्तूच्या जतन-संवर्धनासाठी देण्याचा आदर्श उपक्रम करमाळा येथे पाहायला मिळाला. करमाळा येथील रहिवासी अशोक श्रीरंग आव्हाड (सर) यांनी आपल्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च न करता श्री जगदंबा कमला देवी मंदिर जतन व संवर्धनाच्या कामासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी धनादेशाद्वारे अर्पण केली.
दि. २५ ऑगस्ट २०२६, मंगळवार रोजी अशोक श्रीरंग आव्हाड सर व आव्हाड परिवार, करमाळा यांच्या वतीने ही देणगी मंदिर जतन-संवर्धन समितीकडे सुपूर्द करण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सामाजिक व धार्मिक योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी श्री कमला देवी मंदिर समितीच्या वतीने श्री. अशोक आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समितीचे विश्वस्त सुशील राठोड, मंदिर पुरोहित श्रीनिवास पुराणिक, मंदिर पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे तसेच मंदिर व्यवस्थापक अशोक गाठे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आव्हाड परिवारातील सदस्यांसह मानकरी, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरातन दगडी मंदिराचे मूळ स्वरूप जपण्याचा प्रयत्न :-करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिराला पुरातन दगडी वास्तूचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभले आहे. मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या माध्यमातून या पुरातन वास्तूचे मूळ दगडी स्वरूप भावी पिढ्यांसाठी जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिराच्या पुरातन स्वरूपाचे अधिक सुंदर व ऐतिहासिक दर्शन घेता येणार आहे.
श्री जगदंबा कमला देवी मंदिर ट्रस्टच्या संयोजनातून गेल्या वर्षापासून मंदिर जतन व संवर्धनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून भाविक, भक्त, मानकरी तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मंदिर संवर्धनाचा हा उपक्रम पुढे नेला जात आहे.
चौकट - भाविकांना देणगीचे आवाहन मंदिराच्या जतन-संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी श्री जगदंबा कमला देवी देवस्थान ट्रस्ट, करमाळा यांच्या वतीने भाविक व दानशूर व्यक्तींना सढळ हाताने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरासाठी ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाढदिवस, धार्मिक समारंभ किंवा इतर प्रसंगी होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक कार्यासाठी योगदान देण्याचा अशोक आव्हाड यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
देणगी व अधिक माहितीसाठी संपर्क :
अशोक गाठे, व्यवस्थापक
मो. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!