By : Sangharshkranti Team ,2026-10-26
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 26 ऑक्टोबर 2026
(उज्वला उल्हारे, डाडर)
हिरडगाव : मागील गाळप हंगामात गौरी शुगर कारखान्याने गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये दराने ऊसबिलाचा भरणा केला असून, दिवाळीपूर्वी प्रतिटन आणखी २०० रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. तसेच दिवाळीच्या सणानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर देण्यात येईल. यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आठव्या दिवशी ऊसबिलाची रक्कम जमा केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही ओंकार शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.
हिरडगाव येथील गौरी शुगरच्या चौथ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रेपाटील आणि ओमराजे बोत्रेपाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष बोत्रेपाटील बोलत होते.
यावेळी बोलताना बाबुराव बोत्रेपाटील म्हणाले की, ओंकार शुगर उद्योग समूहाने साखर उद्योगात विस्तार करताना देशातील विविध भागांत ३५ साखर कारखाने चालविण्यापर्यंत मजल मारली आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत उद्योग समूहाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी एक रुपयाही घेतलेला नाही आणि शासनाकडून कोणतीही विशेष सवलत मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, ऊस उत्पादन आणि उपलब्ध ऊसगाळपावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतही गौरी शुगरच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदाच्या हंगामात ऊस गाळपासाठी आल्यानंतर आठव्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊसबिलाची रक्कम जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मागील गाळप हंगामात प्रतिटन ३१०० रुपये दराने ऊसबिलाचा भरणा केल्यानंतर आता दिवाळीपूर्वी प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या सणानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर देण्यात येणार असल्याने कारखान्याच्या या घोषणेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
यंदाचा हंगाम दुष्काळी परिस्थितीत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिल मिळणे, वाहतूकदारांची देयके वेळेत अदा होणे आणि उपलब्ध उसाचे नियोजनबद्ध गाळप होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आठव्या दिवशी पैसे जमा करण्याच्या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकट- कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण फराटे यांनी केले. यावेळी टिळक भोस आणि नवनाथ शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, उद्योग समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, सचिन चौधरी, संतोष दरेकर, कुंडलिक बनकर, भूषण बडवे, सरव्यवस्थापक वसंत चरमळ यांच्यासह दिनू काका पंधरकर, अरुणराव पाचपुते, सुरेश काका क्षीरसागर, सचिनदादा चौधरी, महादेव फराटे, नवनाथ फराटे, संपत अण्णा दरेकर, चिमाजी दरेकर, दादा बनकर, अमोल दरेकर, बाळासाहेब घोलप, दत्ता गायकवाड, माऊली जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार बांधव तसेच ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर नवनाथ दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आठव्या दिवशी ऊसबिल, दिवाळीपूर्वी प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त रक्कम आणि दिवाळीत मोफत साखर, या घोषणांमुळे गौरी शुगरच्या चौथ्या गाळप हंगामाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
माहीजळगावच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा भक्तीमय सोहळ्यात अन्नदान उपक्रमाचे आयोजन
शेतकऱ्यांना दिलासा ! आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या टंचाई आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..
अरिहंत पतसंस्थेंकडून ८०० ठेवीदारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप!
हिरडगाव येथील गौरी शुगरचा ४था गाळप हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन , गाळप हंगामाचा शुभारंभ!
श्री मच्छिंद्रनाथ गडावरील दसऱ्या मेळाव्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
ओंकार शुगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! SISSTA कडून ‘Best Factory Award’ने ओंकार शुगरचा गौरव..
प्रा.श्रीकांत तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ पदवी!
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!