भोसा खिंडीतून सिना धरणात पाणी; आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश!

By : Sangharshkranti Team ,2026-07-31

भोसा खिंडीतून सिना धरणात पाणी; आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 31जुलै 2026

(उज्वला उल्हारे)

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा परिसरात अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने सिना धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या घोगरगाव, बनपिंप्री, थिटे सांगवी, चवरसांगवी, तरडगव्हाण, मांडवगण, रुईखेल, बांगर्डे, खांडगाव तसेच इतर गावांतील शेतकरी चिंतेत होते. पाण्याअभावी खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये हवालदिल वातावरण होते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सिना धरणासाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत सध्या सुरू असलेल्या कुकडी कालव्याच्या रोटेशनमधून भोसा खिंडीतून सिना धरणात १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सिना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असून परिसरातील शेतकरी, नागरिक आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

या निर्णयामुळे घोगरगाव, बनपिंप्री ,थिटे सांगवी, चवरसांगवी, तरडगव्हाण, मांडवगण, रुईखेल, बांगर्डे, खांडगाव तसेच सिना धरणावर अवलंबून असलेल्या इतर गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानत आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या निर्णयामुळे सिना धरणावरील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती, पिण्याचे पाणी आणि परिसरातील जलव्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले आहे.

चौकट- याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार विक्रमदादा पाचपुते म्हणाले, शेतकरी, नागरिक आणि परिसराच्या पाणीप्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भोसा खिंडीतून सिना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा असून भविष्यातही मतदारसंघातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!