ज्ञान, शिस्त आणि संस्कार यशाची गुरुकिल्ली - प्रा .डॉ .रामदास बिटे

By : Sangharshkranti Team ,2026-07-31

ज्ञान, शिस्त आणि संस्कार यशाची गुरुकिल्ली - प्रा .डॉ .रामदास बिटे

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 31जुलै 2026

(उज्वला उल्हारे)

मिरजगाव  येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. 29 जुलै रोजी व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनात असलेल्या गुरूंच्या अनन्यसाधारण महत्त्वाची जाणिव करून देते. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनाला आकार आणि दिशा देणाऱ्या गुरूंचे स्मरण करून त्यांच्या चरणी कृतज्ञ भाव व्यक्त करतो. याच उद्देशाने सदगुरु कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प आणि लेखणी भेट देऊन त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त केला. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक भाषणे केली. हा कार्यक्रम  संस्थेचे संस्थापक  डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा  कल्याणी ताई नेवसे, संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी  सखाराम राजळे, नोडल अधिकारी  अण्णासाहेब रासकर, यांच्या प्रेरणेने झाला.

भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च असून ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्यासाठी गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

चौकट - यावेळी प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी गुरुपौर्णिमेचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करत महर्षी वेदव्यास यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व समजावून सांगत ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी वाघ हिने  केले, तर आभार प्रदर्शन यश पाटील यांनी मानले. या  कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!