By : Sangharshkranti Team ,2026-08-02
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 2 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम आणि संस्कार रुजविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर बी. आर. आंबेडकर युवा प्रतिष्ठान, श्रीगोंदा फॅक्टरी यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी दत्तात्रय गायकवाड, राहुल छत्तिशे, ऋषिकेश बिटके, आकाश जावळे, सुभाष ससाणे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचांगणे मॅडम आणि पऱ्हे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
चौकट - यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा शिर्के (पाचपुते) मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महापुरुषांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. मनीषा गायकवाड मॅडम व नलिनी जरांडे मॅडम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची, त्यागाची आणि समाजासाठीच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संदीप हिरवे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार सीमा खिळे मॅडम यांनी मानले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!