अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली -आकाश शेठ बाफना

By : Sangharshkranti Team ,2026-08-02

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली -आकाश शेठ बाफना

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 2 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील साठेनगर येथे शिवसेना युवा नेते आकाशशेठ बाफना व मित्रमंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला, साहित्याला व सामाजिक परिवर्तनातील योगदानाला अभिवादन करत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि लोकशाहीर म्हणून केलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. त्यांच्या विचारांमधून समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा मिळते. बदलत्या काळातही त्यांचे साहित्य समाजाला दिशा देणारे आणि नवचैतन्य निर्माण करणारे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास ओबीसी नेते शिवकुमार डोंगरे, पांडुरंग माने, स्वप्निल खाडे, विकी पिंपळे, साठेनगरचे अध्यक्ष शरद मोरे, किशोर कांबळे, रवि डाडर, दत्ता क्षिरसागर, दादा डाडर, आतिष डाडर, मनोज डाडर, सोनू क्षिरसागर, प्रेम कांबळे, विनोद कांबळे, नितीन डाडर, गणेश वाघमारे, शेखर मोरे, जितेश डाडर, ओम डाडर, सुमित डोलारे, दीपक रिटे, दादा अडागळे, रविंद्र डाडर, बाळू डाडर, अविराज क्षिरसागर, सुमित घायतडक, क्रिश खंडागळे, संतोष थोरात, सागर कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा कांबळे, पियुष मोरे, अनुप साठे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि साठेनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा, सामाजिक समतेची मूल्ये जपण्याचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

चौकट - यावेळी बोलताना शिवसेना युवा नेते आकाश बाफना म्हणाले, काही माणसं जन्माने नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे त्यापैकीच एक होते. औपचारिक शिक्षणाची मर्यादा असतानाही जीवनाच्या विद्यापीठातून त्यांनी समाजाचे वास्तव जाणले. त्यांनी दिनदलित, कष्टकरी आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून शब्द दिले. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!