न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!

By : Sangharshkranti Team ,2026-08-02

न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 2 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाचन प्रेरणा दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, वाचन संस्कृती आणि वैचारिक प्रगल्भता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी महान विभूतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला. संपूर्ण परिसर देशभक्ती, प्रेरणा आणि ज्ञानाची उपासना या भावनेने भारावून गेला होता.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी  वाचन उपक्रम आणि महान व्यक्तींच्या जीवनकार्यावर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रनिर्मिती, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व, संविधान, पर्यावरण, विज्ञान, ग्रामीण विकास अशा विविध विषयांवर  विद्यार्थ्यांनी कल्पकता, अभ्यासपूर्ण मांडणी आणि उत्कृष्ट लेखनशैलीचा परिचय देत परीक्षकांची दाद मिळवली.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेच्या ग्रंथालयातील विविध पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. महान साहित्यिक, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या चरित्रांचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेल्या वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले.

कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेचे ऐतिहासिक महत्त्व तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून समाजातील अन्याय, विषमता आणि कष्टकरी जीवनाचे वास्तव कसे प्रभावीपणे मांडले गेले, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या साहित्यकृती आजही समाजाला समतेचा, संघर्षाचा आणि मानवतेचा संदेश देतात, असे वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये पवार सर, सय्यद सर, पिसाळ मॅडम, बोराटे सर, चौभारे सर, मोहीते सर , कुसमाळे सर , नगरगोजे मॅडम, लटपटे सर, राजूत सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढण्यास, वक्तृत्वकला विकसित होण्यास, लेखन कौशल्याला चालना मिळण्यास आणि महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी नियमित वाचनाची सवय जोपासण्याचा, समाजहिताची जाणीव ठेवून जबाबदार नागरिक म्हणून कार्य करण्याचा तसेच लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आचरण जीवनात करण्याचा निर्धार व्यक्त केला. अशा शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळून भविष्यात सक्षम, सुसंस्कृत, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख नागरिक घडतील, असा विश्वास यावेळी सर्व शिक्षकांनी व्यक्त केला.

चौकट - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्ता काळे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून लोकमान्य टिळकांचे शिक्षणाविषयीचे विचार, स्वराज्याची संकल्पना, राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना दिलेली वाचा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. वाचन हीच व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असून नियमित वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले.


वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!