By : Sangharshkranti Team ,2026-08-02
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 2 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, गुलमोहर रोड, अहिल्यानगर यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. पहाटेपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या सोहळ्यात हजारो स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्री स्वामी समर्थांच्या कृपादर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणी रुद्राभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता विधिवत स्वामीयाग संपन्न झाला. दिवसभर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वामी नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी दर्शन, पूजा व नामस्मरणाचा आनंद घेतला.
यावर्षीच्या गुरुपौर्णिमा सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे वैभव भारती महाराज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री स्वामी समर्थांनी नित्य वापरलेल्या मूळ दिव्य वस्तूंचा पवित्र दर्शन सोहळा होय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथून आणण्यात आलेल्या या पवित्र वस्तू सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या दुर्मीळ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगरसह परिसरातील हजारो भक्तांनी मोठी गर्दी केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची मनोहारी सजावट आणि धार्मिक वातावरणाने नटला होता. संपूर्ण परिसरात स्वामी नामाचा अखंड जयघोष घुमत असल्याने प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळत होती.
धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाजसेवेचा संदेश देत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. अनेक युवक व स्वामीभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
चौकट - या कार्यक्रमासाठी अवंती क्रेनचे मालक अनिलशेठ भिंगारे तसेच जयहिंद सैनिक संस्थेचे मेजर निळकंठ उल्हारे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे सेवेकरी सुनील मानकर, किरण वाकडमाने, गिरीश धर्माधिकारी, वैभव भारती, प्रतीक भारती, विजय तिमानो, शिवाजी भिसे तसेच सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक, आध्यात्मिक आणि समाजोपयोगी उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री स्वामी समर्थांच्या मूळ वस्तूंच्या दर्शनामुळे भाविकांना अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव लाभला असून, अशा उपक्रमांमुळे श्रद्धा, सेवा आणि समाजजागृती यांचा सुंदर संगम घडत असल्याची भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!