By : Sangharshkranti Team ,2026-08-02
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 2 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
मिरजगाव येथील सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे तसेच सचिव ह.भ.प. राजेंद्रजी गोरे यांच्या प्रेरणेतून सर्व थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येतात. आजचा ही कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. रामदास बिटे, प्रशासकीय अधिकारी श्री. सखाराम राजळे आणि नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले अमूल्य योगदान, राष्ट्रप्रेम आणि जनजागृतीचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान विभूतींच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट - कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सर्व उपस्थितांनी महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!