श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा!

By : Sangharshkranti Team ,2026-08-05

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 5 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होलेवाडी (लिंपणगाव) येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजन या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सप्ताह आषाढ वद्य एकादशी, बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारंभ होऊन आमावस्या, बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सांगता होणार आहे. या सप्ताहाचे आयोजन संत सावता माळी तरुण मंडळ, होलेवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून प्रल्हाद महाराज होले हे नियोजक आहेत.

सप्ताहादरम्यान दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ह.भ.प. किरण महाराज गाडेकर (शास्त्री), ह.भ.प. पांडुरंग महाराज होले, ह.भ.प. प्रभू महाराज माळी, ह.भ.प. भागवताचार्य रामानंद महाराज जायभाय, ह.भ.प. रामायणाचार्य श्रीहरी महाराज देवढे, ह.भ.प. रामायणाचार्य सतिष महाराज खोमणे, ह.भ.प. महामंडलेश्वर कृष्ण महाराज नागे तसेच समारोपाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. वैराग्यमूर्ती काका महाराज पहाणे (पंढरपूर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

तसेच ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. वेदाचार्य हरी महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) यांचे विशेष कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

श्री संत सावता महाराज मंदिरास धर्म मंडप दिल्याबद्दल आमदार विक्रम दादा पाचपुते यांचे होलेवाडी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत या कार्यक्रमासाठी जाहिरात सौजन्य महाकाल ॲक्सेसरीज यांचे असून सजावट सौजन्य श्रीराम फ्लावर डेकोरेटर्स यांनी केली आहे .

चौकट- या सप्ताहात दररोज हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संत सावता माळी तरुण मंडळ, होलेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!