By : Sangharshkranti Team ,2026-08-12
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 12 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनालॉग पनीरवर संपूर्ण महाराष्ट्रात एक वर्षासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड . विक्रमदादा बबनरावजी पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अन्न व औषध प्रशासनाचे महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानत अभिनंदन केले.
आजच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. पनीरसारख्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये भेसळ किंवा दर्जाहीन पर्यायी पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार पाचपुते यांनी म्हटले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अशा पदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जाते. शासनाने अनालॉग पनीरच्या उत्पादन, विक्री व वापरावर एक वर्षासाठी बंदी आणल्याने ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार पनीर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार पाचपुते यांनी व्यक्त केला.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार फायदा
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाही या निर्णयाशी थेट संबंध आहे. शेतकरी मोठ्या मेहनतीने दूध उत्पादन करतो; मात्र बाजारात दुधाला पर्याय म्हणून कृत्रिम किंवा अनालॉग पदार्थांचा वापर वाढल्यास त्याचा परिणाम नैसर्गिक दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेवर होऊ शकतो. त्यामुळे दर्जेदार व अस्सल दुग्धजन्य पदार्थांना प्रोत्साहन मिळणे हे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही सकारात्मक पाऊल आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे आरोग्य, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित या तिन्ही बाबींना महत्त्व मिळाले आहे, असे आमदार पाचपुते यांनी नमूद केले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!