By : Sangharshkranti Team ,2026-08-13
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 13 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
करमाळा येथे श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत भक्तिमय, आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. करमाळा येथील श्रीसंत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव, संपर्क प्रमुख, ज्येष्ठ समाजबांधव, महिला तसेच शिंपी समाजातील बंधू-भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. बळीराम महाराज वायकर (रा. पाडळी) यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून उपस्थित भाविकांना भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. त्यांच्या कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार यांचा संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ प्रशांत गाठे, प्रवीण गाठे व गाठे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सन २०२७ च्या संजीवन समाधी सोहळ्याच्या महाप्रसाद अन्नदानाचे यजमानपद श्रीराम बुलबुले (गुरुजी) स्वीकारणार आहेत.
या सोहळ्याचे यंदाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिंपी समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला. श्रीसंत नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून बँड पथकासह महिलांची एकाच पोशाखातील टाळकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीदरम्यान भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला.
गाठे परिवाराच्या वतीने श्रीसंत नामदेव महाराजांची पूजा व आरती कुमारी गौरी गाठे, वैष्णवी गाठे, स्वरा गाठे आणि आधिरा प्रविण गाठे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शिंपी समाजातील कष्टाळू व होतकरू महिलांचा पुष्पा कैलास वादवणे व कैलास वादवणे, करमाळा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या पाच महिलांचा सत्कार पुष्पा वादवणे यांच्या हस्ते करण्यात आला, तर पुष्पा वादवणे यांचा सत्कार रेणुका गाठे यांच्या हस्ते करण्यात आला.
सन २०२७ च्या संजीवन समाधी सोहळ्याचे यजमानपद स्वीकारणारे श्रीराम बुलबुले (गुरुजी) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच योगिता बुलबुले यांचा सत्कार आरती गाठे व मनिषा वनारसे यांच्या हस्ते करण्यात आला.
या संपूर्ण सोहळ्यात महिलांचा सक्रिय आणि उल्लेखनीय सहभाग हे यंदाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. पूजा, आरती, महिला सन्मान, दिंडी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी पुढाकार घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळ्याला यंदा भक्तीबरोबरच महिला सहभागाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन, टाळकरी दिंडी, महाप्रसाद आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे करमाळा परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज यांच्या भक्तीपरंपरेचा जागर करण्यात आला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!