अहिल्यानगर येथे उद्या जनता दरबार!

By : Sangharshkranti Team ,2026-08-13

अहिल्यानगर येथे उद्या जनता दरबार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 13 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

 श्रीगोंदा- अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला असून, मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी केले आहे.

“आपली समस्या, आमदारांची जबाबदारी!” या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न थेट मांडता येणार आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामांना गती देणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावणे, हा जनता दरबाराचा प्रमुख उद्देश आहे.

श्रीगोंदा - अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील अहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने जनता दरबाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हा जनता दरबार शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, RTO कार्यालयाजवळ, नगर कॉलेजसमोर, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदने व आवश्यक कागदपत्रांसह जनता दरबारात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!