अहिल्यानगर येथे आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

By : Sangharshkranti Team ,2026-08-15

अहिल्यानगर येथे आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 15 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे झालेल्या या जनता दरबारात अहिल्यानगर तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध अडचणी, समस्या आणि प्रलंबित प्रश्न आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्यासमोर थेट मांडले.

जनता दरबाराचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची तत्पर उपस्थिती यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट समन्वय साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. या जनता दरबारात किमान २०० अर्जांवर कार्यवाही करण्यात आली, तर नागरिकांकडून असंख्य निवेदनेही स्वीकारण्यात आली.

महसूल विभागाशी संबंधित प्रकरणे, वीजपुरवठा व विद्युत जोडणीचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, शासकीय योजना, विविध प्रमाणपत्रे, स्थानिक विकासकामे तसेच अन्य नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आमदार पाचपुते यांच्याकडे आपली गाऱ्हाणी मांडली. प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकारी व विभागाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रश्न ऐकून घेण्यापेक्षा त्यावर कार्यवाहीला प्राधान्य-  नागरिकांचे प्रश्न केवळ ऐकून घेणे पुरेसे नाही, तर ते योग्य पातळीवर मांडून त्यावर ठोस कार्यवाही करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे, या भावनेतून आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असल्याने अनेक प्रश्नांवर जागेवरच चर्चा करून पुढील कार्यवाहीचा मार्ग स्पष्ट करण्यात आला.

जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यकर्त्यांची सत्कारासाठीही मोठी गर्दी :-जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळतानाच आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार पाचपुते यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

जनतेच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करणे आणि नागरिकांच्या विश्वासाला न्याय देणे, या उद्देशाने जनता दरबाराची ही थेट जनसंवादाची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर...जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध! या भूमिकेतून आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा जनता दरबार नागरिकांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!