कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी सौरभ देशपांडे यांची ५ हजार १ रुपयांची देणगी!

By : Sangharshkranti Team ,2026-08-16

कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी सौरभ देशपांडे यांची ५ हजार १ रुपयांची देणगी!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 16 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

 करमाळा येथील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी भाविकांकडून देणगीच्या माध्यमातून मोठा हातभार लावला जात आहे. याच सामाजिक व धार्मिक उपक्रमाला प्रतिसाद देत  सौरभ सुनील देशपांडे, रा. करमाळा, सध्या पुणे यांनी श्री कमलादेवी मंदिर जीर्णोद्धारासाठी ५ हजार १ रुपयांची ऑनलाइन देणगी अर्पण केली.

दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी ही देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाच्या कामासाठी प्राप्त झाली. देणगीबद्दल श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक अशोक गाठे, मानकरी, सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरातन मंदिराचे मूळ दगडी स्वरूप जपण्याचा प्रयत्न

करमाळा शहराच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवात महत्त्वाचे स्थान असलेल्या श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूप जतन करून त्याचे संवर्धन करण्याचे काम गेल्या वर्षापासून हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या मूळ वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व आणि पारंपरिक दगडी रचना अबाधित ठेवत भावी पिढ्यांनाही या प्राचीन वास्तूचे दर्शन घेता यावे, हा या जतन-संवर्धन उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

मंदिर जतन व संवर्धनाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, भक्तांच्या देणगीरूपी सहकार्यामुळे या महत्त्वाकांक्षी कामाला गती मिळत आहे. मंदिराचे काम व्यापक स्वरूपाचे असल्याने त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे करमाळ्यासह देश-विदेशातील तसेच पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कमलादेवी भक्तांनी पुढे येऊन या धार्मिक व ऐतिहासिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देणगीदार भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

श्री कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी अनेक भाविक स्वयंस्फूर्तीने देणगी देत असून, प्रत्येक देणगी या कामासाठी महत्त्वाची ठरत आहे. छोट्या-मोठ्या स्वरूपातील देणगीच्या माध्यमातून भाविक मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवत आहेत. सौरभ सुनील देशपांडे यांनी दिलेली ५ हजार १ रुपयांची देणगीदेखील या भक्तिभावपूर्ण उपक्रमातील योगदानाचे उदाहरण ठरले आहे.

“कमलादेवीच्या चरणी अर्पण केलेली प्रत्येक देणगी ही मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी मोलाची वीट आहे,” या भावनेतून अधिकाधिक भाविकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

चौकट - ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध

श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, करमाळा यांच्या वतीने मंदिर जतन व संवर्धनाच्या कामासाठी भाविकांना ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे करमाळ्याबाहेर असलेल्या भाविकांनाही या पवित्र कार्यात सहज सहभागी होता येणार आहे.

श्री कमलादेवी मंदिराचे जतन-संवर्धन हे केवळ मंदिराच्या वास्तूचे संवर्धन नसून करमाळ्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन आहे. त्यामुळे या कार्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

देणगी व अधिक माहितीसाठी संपर्क :

अशोक गाठे, व्यवस्थापक

मो. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!