By : Sangharshkranti Team ,2026-08-16
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 16 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य घडून येते. नव्या पिढीला आपल्या जुन्या परंपरा आणि इतिहासाची माहिती मिळते. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो. समाजात बंधुभाव एकात्मता आणि आपुलकी वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन माय भारत अहिल्यानगरचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष यांनी केले.
80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता पखवाडा अंतर्गत माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडाण फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीवर गीत गायन, नृत्य स्पर्धा आणि महाराष्ट्राची लोकधारा सादरीकरणाचे कार्यक्रम शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहात पार पाडले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, प्रा. डॉ. शंकर अंदानी, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. अनिता दिघे, शाहीर कान्हू सुंबे, शासनाचा राज्य युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, रजनी ताठे, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे आदी पाहुणे उपस्थित होते.
पुढे सत्यजित संतोष म्हणाले की, मुलांमधील निरागसता जपा. त्यांचे बालपण बहरु द्या. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीमातेला पाणी अर्पण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. शंकर अंदानी लिखित लेक लाडकी या पुस्तकाला उडान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, योग ही प्राचीन भारतीय संस्कृती असून, आज जगभराने योगाचा स्वीकार केला आहे. युनिटी योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष योग प्रात्यक्षिक या सोहळ्यात युवकांनी सादर केले. मानवी जीवनासाठी दररोज योग केला पाहिजे. अहिल्यानगर मधील विविध शाळा, महाविद्यालय, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, नृत्य व महाराष्ट्राची लोकधारा 80 व्या स्वातंत्र दिनी सादर करून स्वतंत्र्याचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अक्षय कर्डिले यांनी उडान फाउंडेशन ही संस्था रतडगाव या छोट्याश्या गावातून येऊन जिल्हाभर सामाजिक योगदान देत आहे. ही संस्था सात वर्षापासून महिला, युवक, युवती आणि विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजासाठी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून, उपस्थितांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
चौकट- स्पर्धेचे परीक्षण नृत्य विशारद अनंत द्रविड व संगीतकार तथा निवेदक राजेंद्र टाक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे व ॲड. गायत्री गुंड यांनी केले. प्रास्ताविक उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. स्पर्धेच्या संयोजनासाठी रजनी ताठे, रोहिणी थोरात, वनिता पाडळे, अक्षय शिंदे, जयेश शिंदे, विद्या शिंदे, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, मंजू रॉय, तुषार शेंडगे, तुषार रणनवरे, अनिल साळवे, कविता अभंग, धीरज ससाणे, भाऊसाहेब पादीर, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ईसाभाई शेख, भारती शिंदे, बाळू बनसोडे, शुभम शिंदे, अनुराधा शिंदे, तनिश बनसोडे, हर्षल वामन, छाया शिंदे, दिलीप शिंदे, फरान खान, सार्थक जाधव, ऐश्वर्या बनसोडे, प्रतीक्षा वामन आदींनी परिश्रम घेतले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!