इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू," />

विधानसभेतील प्रभावी लक्षवेधी, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना FDA ची कारणे दाखवा नोटीस!

By : Sangharshkranti Team ,2026-08-16

विधानसभेतील प्रभावी लक्षवेधी, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना FDA ची कारणे दाखवा नोटीस!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 16 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला व गुटख्यासारख्या उत्पादनांच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या जाहिरातींविरोधात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी ४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभेत ठामपणे आवाज उठवला होता. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेते व सेलिब्रिटींचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.

या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या विषयावर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या संबंधित अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला आणि त्यानंतर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

तंबाखू, गुटखा, पान मसाला व आरोग्यास घातक उत्पादनांवर निर्बंध असताना त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, सौफ किंवा अन्य उत्पादनांची जाहिरात करून ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करण्याचा प्रकार सर्रासपणे केला जातो. लोकप्रिय अभिनेते आणि सेलिब्रिटींच्या माध्यमातून होणाऱ्या या जाहिरातींचा प्रभाव विशेषतः तरुण पिढीवर पडण्याची शक्यता असल्याने हा केवळ जाहिरातींचा विषय नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याची भूमिका आमदार पाचपुते यांनी मांडली होती.

“जाहिरात इलायचीची किंवा सौफची असली, तरी त्यामागे जर तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडची प्रसिद्धी होत असेल, तर केवळ उत्पादनाचे नाव बदलून सामाजिक जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मोठ्या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा प्रभाव लाखो तरुणांवर पडतो. त्यामुळे अशा जाहिराती स्वीकारताना त्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” असे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्पष्ट केले.

या विषयावर परिणाम दिसण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला असला तरी सातत्याने केलेला पाठपुरावा अखेर फलदायी ठरला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून कारणे दाखवा नोटीस ही पुढील कारवाईची महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. संबंधित प्रकरणांमध्ये कायद्याच्या तरतुदींनुसार योग्य ती ठोस कारवाई करण्यात यावी आणि अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रभावी आळा बसावा, अशी अपेक्षा आमदार पाचपुते यांनी व्यक्त केली.

चौकट- विधानसभेत प्रश्न मांडणे ही केवळ सुरुवात असते. त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाईपर्यंत नेणे महत्त्वाचे असते. ४ जुलै २०२५ रोजी मांडलेल्या मागणीवर आज कारवाई सुरू झाली, याचे समाधान आहे. एक वर्ष लागले, पण पाठपुराव्याला यश आले. जनहिताचा विषय असेल तर तो अंतिम परिणाम मिळेपर्यंत सोडायचा नाही, हीच माझी भूमिका आहे, असे आमदार विक्रम दादा पाचपुते यांनी सांगितले.

एक वर्षाचा पाठपुरावा  आता प्रत्यक्ष कारवाई :-४ जुलै २०२५ महाराष्ट्र विधानसभेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा मुद्दा उपस्थित मागणी अशा जाहिराती करणाऱ्या अभिनेते व सेलिब्रिटींची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी सातत्यपूर्ण पाठपुरावा  शासन व संबंधित यंत्रणांकडे विषयाचा सातत्याने पाठपुरावा १६ ऑगस्ट २०२६  FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून संबंधित अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस

“उशीर झाला, पण पाठपुरावा थांबला नाही  आणि अखेर जनहिताच्या लढ्याला यश मिळाले.”

 विक्रमदादा पाचपुते आमदार, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ

  

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!