तांदळी दुमाला ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम " />

तांदळी दुमाला येथे गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण,लोकनियुक्त सरपंच संजय निगडे अण्णांची अनोखी संकल्पना!

By : Sangharshkranti Team ,2026-08-16

तांदळी दुमाला येथे गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण,लोकनियुक्त सरपंच संजय निगडे अण्णांची अनोखी संकल्पना!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 16 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

तांदळी दुमाला ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे अण्णा यांच्या संकल्पनेतून तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयातील मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

युवा पिढी ही देशाचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय कर्तव्याची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सलग दोन वर्षांपासून तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयातील मुलींनी गुणवत्तेत आघाडी घेतली असून, यंदाही गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.

एसएससी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये कु. शेळके सृष्टी मारुती - ९१ टक्के, कु. शेळके तेजश्री प्रकाश  -८९.६० टक्के आणि कु. नाळे वेदिका संतोष . ८९.४० टक्के यांचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

ध्वजारोहण कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.

गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची ही संकल्पना केवळ सन्मानापुरती मर्यादित न राहता गावातील इतर विद्यार्थ्यांनाही मेहनत, गुणवत्ता आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी ठरली. शिक्षणात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पर्वाशी जोडून त्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला.

युवा पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत अधिक प्रज्वलित व्हावी आणि गुणवत्तेचा आदर्श समोर यावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘गुणवत्ता, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी’ यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

या वेगळ्या उपक्रमामुळे तांदळी दुमाला येथील स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष ठरला. ग्रामपंचायतीच्या या संकल्पनेचे ग्रामस्थांनी स्वागत करून गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

देशप्रेम, शिक्षण, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत तांदळी दुमाला ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

चौकट - सरपंच संजय निगडे अण्णा यांच्या कार्यपद्धतीत दूरदृष्टी, कर्तव्यदक्षता, समन्वय आणि योग्य धोरणाला विशेष महत्त्व आहे. तळागाळातील घटकांना सोबत घेऊन गावाचा कारभार करणे आणि विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येक घटकाला सहभागी करून घेणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात.

गाव आदर्श गाव म्हणून पुढे राहावे, विविध शासकीय योजनांमध्ये अग्रेसर राहावे आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने नियोजन आणि प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे तांदळी दुमाला गावाने विविध उपक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!