नवनाथनगर शाळेचे नाव राज्यात झळकले!

By : Sangharshkranti Team ,2026-08-18

नवनाथनगर शाळेचे नाव राज्यात झळकले!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 18 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनाथनगरच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव राज्यस्तरावर झळकविले आहे. इयत्ता चौथीतील विद्यार्थी हृदयांश बाळासाहेब शिंदे याने तब्बल २८४ गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक, तर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे नवनाथनगर शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.

याच परीक्षेत अनुज गणेश फडताळे याने २७० गुणांसह अहिल्यानगर जिल्ह्यात सहावे स्थान मिळविले. तसेच सिद्धेश प्रविण खेंडके आणि आदित्य दीपक कळसकर यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात भर घातली.

शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकाल :-नवनाथनगर शाळेतील इयत्ता चौथीचे तब्बल २१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातून शाळेचे विशेष कौतुक होत आहे.

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव :-नवनाथनगर शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, शालेय पोषण आहार अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, दैनिक संघर्षनामा चे संपादक मेजर भिमराव उल्हारे, पत्रकार उज्वला उल्हारे, आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा श्रीगोंदा केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहळकर, पेडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गहिनीनाथ शिंदे, सरपंच अजित लकडे, उपसरपंच किरणताई लकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश क्षिरसागर, उपाध्यक्ष सोनालीताई नवले, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई बिबे, महेश झुंजरुक तसेच नवनाथनगर ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षिका संगीता पावटे-होले यांचे मोलाचे मार्गदर्शन :-या उल्लेखनीय यशामध्ये शाळेतील उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सौ. संगीता पावटे-होले मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत वर्षभर विविध शैक्षणिक व उपक्रमशील कार्यक्रम राबविले जातात. त्यासाठी संगीता पावटे-होले यांनी तन-मन-धनाने घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. रविंद्र होले सर यांचेही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

स्वातंत्र्य दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान :-स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह वर्गशिक्षिका सौ. संगीता पावटे-होले यांचा शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे नवनाथनगर गावाच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!