By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 18 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या पवित्र कार्यासाठी करमाळा येथील संदेश कमल शिवाजी खुळे यांनी ५ हजार १ रुपयांची देणगी श्री कमलादेवीच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या या योगदानातून मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कार्याला मोलाची साथ मिळाली आहे.
श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनासाठी सुरू असलेल्या या कार्याच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने संदेश खुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी नारायण सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे, रघुनाथ खटके, लक्ष्मण हवलदार यांच्यासह खुळे परिवार, मानकरी, सेवेकरी व भाविक भक्त उपस्थित होते.
करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिराला प्राचीन दगडी वास्तूचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. या पुरातन मंदिराचे मूळ दगडी स्वरूप जतन करून त्याचे संवर्धन करण्याचे काम श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून सुरू आहे. मंदिर जतन व संवर्धनाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, भाविकांनी दिलेल्या देणगी व सहकार्याच्या माध्यमातून या पवित्र कार्याला मोठी चालना मिळत आहे.
मंदिराचे पुरातन वैभव, दगडी बांधकाम आणि ऐतिहासिक स्वरूप भावी पिढ्यांसाठी जतन व्हावे, तसेच भाविक भक्तांना श्री कमलादेवीच्या मूळ मंदिराचे दर्शन घेता यावे, यासाठी सुरू असलेल्या या कार्यात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या धार्मिक व ऐतिहासिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांसाठी ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देणगीसाठी संपर्क :
अशोक गाठे, व्यवस्थापक
मो. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४
चौकट :
“पुरातन श्री कमलादेवी मंदिराचे वैभव जतन करण्यासाठी प्रत्येक भाविकाचा हातभार महत्त्वाचा; देणगीच्या माध्यमातून या ऐतिहासिक कार्यात सहभागी व्हा!”
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!