By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 18 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आज पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी मोठी दर्शन व महाभिषेक घालण्यासाठी गर्दी केली. श्रावण महिना सुरू होताच लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची महाभिषेक व दर्शनासाठी दररोज मंदिर परिसर गजबजून जातो. त्यामध्ये श्रावण महिन्यात ग्रामस्थांकडून आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील केले जाते. 18 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह गावात प्रारंभ होत आहे. सायंकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन व प्रवचन करांची कीर्तने आयोजित केली जातात. या सप्ताह कालावधीमध्ये ग्रामस्थांकडून दररोज उपस्थित भाविकांना कीर्तन सेवा पूर्ण झाल्यानंतर अन्नदान केले जाते. संपूर्ण श्रावण महिन्यात लिंपणगावमध्ये पंढरीचे स्वरूप निर्माण होते. अनेक भाविक भक्त दूरवरून सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
सिद्धेश्वर महाराज हे जागृत देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. काष्टी श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले हे पुरातन कालीन हेमाडपंथी मंदिर भक्तांसाठी परवणी ठरले आहे. नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान असल्याने अनेक भाविक भक्त आपला वर्षपूर्तीचा नवस श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करतात. त्यातून अनेक भक्तजन मंडळीला या जागृत देवस्थाने सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त झाल्याने अनेकांचा या जागृत देवस्थानवर विश्वास दिसून येतो. या सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहाटेपासूनच सिद्धेश्वर महाराजांना महाभिषेक घालण्यासाठी भाविक भक्त व आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे लिंपणगावमध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविक भक्तांसाठी पुरातत्व विभागाने महाअभिषेक व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून,उपस्थित भाविक भक्तांना महाभिषेक व पूजाअर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञ सुधीर कुलकर्णी व गुरव दांपत्य हे मौलिक असे सहकार्य करत आहे. भाविकांनी सप्ताह कालावधीत श्रावणी सुखाचा लाभ घेऊन, सप्ताह मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन सप्ताह मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!