By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 18 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मढेवडगाव येथील उंडेमळा जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी अस्मिता प्रदीप उंडे हिने प्रज्ञा शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याबद्दल तिचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. प्रहार दिव्यांग अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी अस्मिताला सायकल भेट देऊन तिचा सन्मान केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, या सकारात्मक संदेशाचे हे उदाहरण ठरले.
मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थिनीच्या यशाचे कौतुक :-यावेळी सहकारमहर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषकाका शिंदे, लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, माजी उपसरपंच अमोल गाढवे, गोरखराव मांडे, पोलीस अंमलदार योगेश उंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, बाबासाहेब फापाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज सुपेकर, माजी अध्यक्ष नवनाथ उंडे, प्रहारचे सुरेश गलांडे, युवानेते संग्राम शिंदे, निळकंठ उंडे, महाराजा शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रदीप उंडे, संतोष इंगावले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रामदास ठाकर यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
लोकसहभागातून २५ हजारांची वस्तूरूप मदत :-कार्यक्रमात सुमारे २५ हजार रुपयांचा वस्तूरूपाने लोकसहभाग मिळाला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा देवयानी शिंदे यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.
पालक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती :-कार्यक्रमास डॉ. अरविंद उंडे, माणिकराव मांडे, भरत शिंदे, सुनील उंडे, महेश शिंदे, संजय शिंदे, जगदेव उंडे, भाऊसाहेब शिंदे, अनिल थोरात, पांडुरंग उंडे, खंडू उंडे, सचिन गिरे, गणेश शिंदे, सोमनाथ खराडे, स्वप्निल वाबळे, प्रमोद वाबळे, पांडुरंग ढेपे, सुहास मिसाळ, दिलीप नेताम, हरनारायण धृव, उपाध्यक्षा श्रद्धा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सोनाली उंडे, निता मांडे, कल्पना उंडे, प्रज्ञा शिंदे, प्राजक्ता उंडे, रोहिणी वाबळे, शितल शिंदे, वैशाली शिंदे, सविता मांडे, सुवर्णा शिंदे, प्राजक्ता शिंदे, सीमा उंडे, सुजाता थोरात, वर्षा उंडे, मंगल उंडे, सुनिता कार्ले, मंदा मांडे, सुमन उंडे, लंका उंडे, चंदाकाकी उंडे, कमल शिंदे, रतन शिंदे, सुलोचना मांडे, सुनिता मांडे, सारिका वाघमारे, प्रियंका शिंदे, तृप्ती शिंदे, श्रद्धा उंडे यांच्यासह माता, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष इंगावले यांनी केले, तर आभार नवनाथ उंडे यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा मिळू शकते, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!