By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 18 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा राहुरी येथे नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील फाऊंडेशनचे पदाधिकारी, समाजबांधव, विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी येथील मा. नगराध्यक्ष दशरथ पोपळघट हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, नगरसेवक केतन पोपळघट, नायब तहसीलदार राजेंद्र लाड,कार्यकारी अभियंता दीपक आगळे,शांताराम लोखंडे, प्रभाकर लाड, फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे,अजय खंडागळे, नितेश लोखंडे, रवींद्र थोरात,राजेंद्र आगळे, बाळासाहेब लोखंडे, बाबा हरेल, उत्तमराव लोखंडडचूर, विशाल जवने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्योगश्री माय-माऊली, शिक्षणश्री,विशेष सेवा पुरस्कार तसेच कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.तसेच डॉ. प्रमोद थोरात,अभियंता अभिजीत म्हस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणात फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी संघटनेचे ध्येय-धोरण आणि गेल्या बारा वर्षांतील फाऊंडेशनच्या वाटचालीचा आढावा सांगितला.यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र लाड यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक चांगले गुण मिळवून एम.पी.एस.सी, तसेच यू.पी.एस.सी व राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या पदांवर जाऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. दीपक आगळे यांनी समाजातील नव युवकांनी पारंपरिक व्यवसायाला आधुनिक डिजिटल मशीनरीची जोड देऊन उद्योग-व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे विविध मान्यवरांची आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले.
तसेच लोहार युथ फाऊंडेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यामध्ये राहुरी शिक्षण प्रमुखपदी विलास थोरात,अहिल्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दादासाहेब आगळे,नगर उत्तर जिल्हाप्रमुख अतिश हरेल,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ कौसे,राहुरी संघटकपदी रोहन गाडेकर,तर राहुरी तालुकाप्रमुख म्हणून अमोल रणसिंग यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच महिलांमध्ये नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी वैशाली थोरात, दक्षिण विभाग महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई थोरात यांच्या नवनियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.
चौकट- या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे व विलास थोरात यांनी केले तर आभार अतिश हरेल सर यांनी मानले.कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारिणीचे सदस्य सागर आगळे, दत्तात्रय पोपळघट, सुनीता गाडेकर, विजय हरिहर, अमोल जवणे, अतिश हरेल, आदिनाथ कौसे, संदीप पखाले, नवनाथ दवणे, जयराम आगळे, सागर ईघे, अरुण ईघे, किरण ईघे, प्रेम नन्नावरे, किशोर नन्नावरे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी अन्नदानाची व्यवस्था दशरथ पोपळघट व दिलीप रामभाऊ पवार यांनी केली तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्ञानेश्वर पोपळघट, सावळी विहीर यांनी केली.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!