By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 18 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
बेलवंडी येथील बेलवंडी व्यापारी सहकारी पतसंस्थेचे सभासद दत्तात्रय विधाटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी पतसंस्थेच्या सभासद विमा योजनेने विधाटे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार दिला. विमा योजनेतून मयत सभासदाचे कर्जमुक्तीबरोबरच १२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. दुःखाच्या प्रसंगी मिळालेल्या या मदतीमुळे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला.
या मदतीचा धनादेश पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव डाके यांच्या हस्ते मयत सभासदाच्या वारसदार पत्नी मनीषा विधाटे व सुषमा विधाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सभासदांच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच पतसंस्था सामाजिक बांधिलकीही जपत आहे. तालुक्यात अग्रगण्य विमा कवच देण्यासोबतच सभासदांच्या ठेवींना सुरक्षा, लाभांश (डिव्हिडंड) देण्याची परंपरा, बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या बेवारस अंत्यविधीसाठी मदतीचा हात तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध उपक्रमांतून संस्थेचे सामाजिक कार्य सुरू आहे.
या प्रसंगी संचालक सोपान हिरवे, युवराज पवार, विठ्ठल लोखंडे, अर्जुन हिवरकर, अनिल शेलार, सचिन भोसले, संपत हिरवे, राजू साळवे, राजाराम खलाटे, संदीप लबडे, आशा दरवडे, प्रवीण खेडकर, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
संकटाच्या काळात विमा योजनेच्या माध्यमातून मिळालेली ही मदत विधाटे कुटुंबासाठी केवळ आर्थिक सहाय्य नाही, तर सभासदांच्या सुख-दुःखात पतसंस्था खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असल्याचा दिलासादायक संदेश ठरला आहे.
चौकट- यावेळी अध्यक्ष उत्तमराव डाके म्हणाले, “सभासदाच्या कुटुंबावर अचानक संकट ओढवल्यास त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि दुःखाच्या काळात कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळावा, या उद्देशाने पतसंस्थेच्या माध्यमातून विमा योजना राबविण्यात येत आहे.”
पतसंस्थेचे सचिव किसन वऱ्हाडे यांनी सांगितले की, संस्थेच्या सुमारे ४ हजार सभासद, ठेवीदार व कर्जदारांचा विमा उतरविण्यात आला आहे. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!