सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

By : Sangharshkranti Team ,2026-08-18

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 15 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांनी आपला वाढदिवस अनाथ, निराधार व वंचित बालकांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. तपोवन रोड येथील रुद्रपूजा फाउंडेशन संचलित बालघर प्रकल्पात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालघर प्रकल्पातील बालकांसोबत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करत विराज औचीते यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील बालकांना मिष्ठान्न भोजन, शालेय साहित्य तसेच क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ औपचारिक कार्यक्रम न करता गरजू व वंचित बालकांच्या जीवनात आनंदाचा क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न विराज औचीते यांनी केला.

कार्यक्रमादरम्यान बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वाढदिवसाचा आनंद त्यांच्यासोबत वाटून घेताना विराज औचीते यांनी बालकांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, आवडी-निवडींबाबत तसेच भविष्यातील स्वप्नांबाबतही माहिती घेतली. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, उत्साह आणि समाधान पाहून उपस्थितांचे मनही भारावून गेले.

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढदिवस म्हटले की मोठ्या पार्ट्या, केक आणि दिखाऊपणाला प्राधान्य दिले जाते. मात्र, विराज औचीते यांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळी आणि सकारात्मक दिशा समाजासमोर आली आहे.

“वाढदिवसाचा खरा आनंद केक कापण्यात नाही, तर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आहे,” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला. समाजातील गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासाला हातभार लावण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.

बालघर प्रकल्पात सुरू असलेल्या सामाजिक कार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले. अनाथ, निराधार आणि वंचित बालकांना आधार देत त्यांच्या शिक्षण, संगोपन आणि भविष्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

चौकट- वाढदिवसाला सामाजिकतेची जोड!

विराज औचीते यांनी बालघर प्रकल्पातील बालकांसोबत वाढदिवस साजरा करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. मिष्ठान्न भोजनासोबत शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप करत त्यांनी बालकांच्या आनंदात आपला आनंद शोधला.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!