By : Sangharshkranti Team ,2026-08-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 15 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ढोरजा येथील श्री काशी विश्वनाथ देवस्थानचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविकांनी येथे हजेरी लावत श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. भाविकांची गर्दी रात्री १२ वाजल्यापासूनच वाढू लागली होती.
यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते आणि डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का यांनी श्री काशी विश्वनाथाचे विधीवत दर्शन घेत भाविकांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मा .जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई सचिनभाऊ जगताप ,श्रीगोंदा उपनगराध्यक्षा अलकाताई अनभुले,महिला बालकल्याण सभापती मिराताई शिंदे ,जेष्ठ नेते पोपटआबा खेतमाळीस, ह.भ.प बाळासाहेब महाडिक आणि युवानेते दिग्विजय नागवडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रांगेत शिस्तबद्धपणे उभे राहत भगवान श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी श्रावण सोमवारचे औचित्य साधून अभिषेक, पूजा-अर्चा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. दिवसभर मंदिर परिसरात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे अनोखे वातावरण निर्माण झाले होते.
श्रद्धास्थानासोबतच निसर्गरम्य पर्यटनस्थळ :-श्री काशी विश्वनाथ देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असून, निसर्गरम्य परिसरामुळे हे एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, खाद्यपदार्थ व खाऊची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे महिला, लहान मुले आणि नागरिकांची मोठी गर्दी परिसरात पाहायला मिळाली.
यात्रोत्सवामुळे ढोरजा परिसराला जणू उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी व मनोरंजनाची साधने यामुळे परिसरात दिवसभर लगबग सुरू होती. ग्रामीण भागातील या पारंपरिक यात्रेला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. दूरवरून आलेले भाविक कुटुंबीयांसह यात्रेचा आनंद घेत असल्याचे चित्र दिसून आले.
विकासकामांमुळे भाविकांची सोय :-भाविकांच्या सुविधेसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत देवस्थान परिसरात विविध विकासकामे करण्यात आली असून काही सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सहकार्यामुळे देवस्थानकडे येणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. ढोरजा गावातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गैरसोय टळली.
देवस्थान परिसरातील विकासकामांमुळे भविष्यात या धार्मिक स्थळाला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यास मदत होणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता रस्ते, पार्किंग, पाणी, स्वच्छता, दर्शन व्यवस्था आणि परिसर सुशोभीकरणाला महत्त्व दिले जात असल्याने यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत. काशी विश्वनाथ देवस्थानचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.
पोलीस बंदोबस्तासह दर्शन व पार्किंगचे नियोजन :-यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर दर्शन रांग, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेत सहकार्य केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवक व पोलीस मित्रांनी सहकार्य केले. त्यामुळे मोठी गर्दी असूनही यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
भाविकांची श्रद्धा, ग्रामस्थांचे नियोजन, प्रशासनाचा बंदोबस्त आणि देवस्थान ट्रस्टच्या सुविधांमुळे श्री काशी विश्वनाथ यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने झालेल्या या यात्रोत्सवाने ढोरजा गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामस्थांचे नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे यात्रोत्सवाला यश आले. भविष्यात या यात्रेला आणखी व्यापक स्वरूप मिळून श्री काशी विश्वनाथ देवस्थान हे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी भावना भाविक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
चौकट - यात्रेचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. चेअरमन रावसाहेब वाणी, ग्रामपंचायत सदस्य माणिक आप्पा व्यवहारे, काशी विश्वनाथ देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, सरपंच अमोल कोहक, बाबासाहेब बारगुजे, चेअरमन भास्कर वागस्कर, उपसरपंच अण्णासाहेब भिसे, देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब रणसिंग, खजिनदार अनिल टकले, ग्रामपंचायत सदस्य अजय पारधे, माजी सरपंच नवनाथ कोहक, बाळासाहेब कोहक, मारुती मेटे, संदीप ढोरजकर, दशरथ कोहक, जालिंदर व्यवहारे, अजिनाथ ढोरजकर, अंबादास वाळके, संतोष वाणी, नाथा व्यवहारे, बापूराव व्यवहारे, दादासाहेब थोरात, राहुल कारंडे, खंडू भिसे, संतोष कारंडे, उमेश व्यवहारे, नवनाथ कांबळे, संपत वाणी, मल्हारी कोहक, सागर थोरात, अशोक कोहक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!