By : Sangharshkranti Team ,2026-08-19
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 19 ऑगस्ट 2026
(उज्वला उल्हारे)
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळणारे सुनिल विजय गव्हाणे यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी या गावातून पिंपरी चिंचवड शहरात गेलेले सुनिल गव्हाणे यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी कार्याध्यक्ष आणि नंतर शहराध्यक्ष पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पक्षाने सहा वर्षापूर्वी थेट महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली होती. सुनिल गव्हाणे यांनी गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. विद्यार्थी शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिक्षणातील विविध प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलने, निवेदने आणि जनजागृतीच्या माध्यमातून भूमिका मांडली. विद्यार्थी प्रश्नांसोबतच राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचा जवळून अभ्यास केला. या काळात हजारो विद्यार्थी, युवक आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क निर्माण झाला. त्यांच्या या संघटनात्मक अनुभवाची आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत आता पक्षाने त्यांच्यावर फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयक म्हणून अधिक व्यापक जबाबदारी सोपवली आहे.
या माध्यमातून पक्षाच्या विविध फ्रंटल संघटना आणि सेल यांच्यात समन्वय साधणे, त्यांचे संघटनात्मक काम अधिक प्रभावी करणे, विविध विभागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काम करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
चौकट - नवीन नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनिल गव्हाणे म्हणाले,
“पक्ष संघटनेतील कार्याबरोबर पक्षाच्या व्यासपीठाची मदत घेऊन आता श्रीगोंदा तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार"
गेले अनेक वर्ष पक्षाच्या पक्षसंघटनेत काम करत आलो आहे. मात्र राजकीय क्षेत्रात असून देखील वेळेअभावी ज्या तालुक्याचा सुपुत्र आहे त्या तालुक्यातील लोकांसाठी जास्त काम करता आले नाही. यापुढे मात्र पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग त्यासाठी करणार आहे. तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे
विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा हा प्रवास सुनिल गव्हाणे यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!