अहिल्यानगर- मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी २० होमगार्ड तैनात करण्याची मागणी!

By : Sangharshkranti Team ,2026-01-19

अहिल्यानगर- मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी २० होमगार्ड तैनात करण्याची मागणी!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.19 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

अहिल्‍यानगर मनमाड या रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामामुळे होत असलेल्‍या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या निर्देशानंतर जिल्‍हा प्रशासनाने राज्‍याच्‍या होमगार्ड नियुक्‍तीसाठी हालचाली सुरु केल्‍या असून, अधिकचे मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी राज्‍याच्‍या होमगार्ड विभागाकडे मागणी केली आहे.

अहिल्‍यानगर मनमाड महामार्गाच्‍या कामाच्‍या राहुरी शहर आणि परिसरातील बहुतांशी ठिकाणी वाहतुक वळविण्‍यात आली आहे. एकेरी वाहतूक सुरु असल्‍याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्‍या वाहतूक कोंडीमुळे स्‍थानिक नागरीक, प्रवासी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मोठ्या प्रमाणात अडचण होवू लागली आहे. सर्वच व्‍यवस्‍थांवर या वाहतूक कोंडीचा विपरीत परिणात झाला आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जिल्‍हा प्रशासनाला वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्‍याचे तातडीने निर्देश दिले होते. वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अधिकचे मनुष्‍यबळ उपलब्‍ध करावे अशी सुचना त्‍यांनी जिल्‍हा  प्रशासनास दिल्‍या होत्‍या. यासर्व पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनीही जिल्‍हा पोलिस प्रशासनास होमगार्ड पथक उपलब्‍ध  करुन देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत.

पोलिस प्रशासनानेही होमगार्डच्‍या राज्‍याच्‍या महासमादेशकांना वाहतूक नियमनासाठी तीस दिवसांच्‍या कालावधीसाठी २० होमगार्ड उपलब्ध करुन देण्‍याची विनंती केली आहे. अहिल्‍यानगर मनमाड मार्गाचे काम आता वेगाने सुरु झाले असून, दोनच दिवसांपूर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वत: रस्‍त्‍यावर उतरुन वाहतूक कोडींची समस्‍या  सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले होते.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस