By : Sangharshkranti Team ,2026-03-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
पारनेर [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] - कुकडी कालव्याचे पाणी दि . २५ ला सोडणार होते , प्रत्यक्षात काल दि ३ ला ही पाणी आले नाही . या व शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर , माझ्या नावावर शेती नसतानाही त्यांच्या प्रति असणाऱ्या तळमळीने मी आज ही लढतोय , अशी तळमळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ . भास्करराव शिरोळे यांनी व्यक्त केली .
कुकडी कालव्या लगत असणाऱ्या निघोज परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी पिके कुकडी कालव्याचे पाणी न सुटल्यामुळे अक्षरशः करपून गेली आहे . पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणी साठी परिसरातील शेतकऱ्यांनी निघोज बसस्थानकाच्या मुख्य चौकात माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन तास रोको केला . यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .
यावेळी बोलताना डॉ शिरोळे पुढे म्हणाले की , या कुकडी कालवा पाटाच्या असतारी करणाची गरज , ही फक्त पारनेरकरांनाच आहे का ? सोलापूरच्या करमाळ्या पर्यंत पाणी नेण्याची ही धडपड आहे , असा आरोप ही डॉ . शिरोळे यांनी केला .
माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की , १५ दिवसांपूर्वी आम्ही शिष्टमंडळा सोबत अधिकाऱ्यांना पाणी सोडण्या संदर्भात निवेदन देत चर्चा केली व त्वरीत पाणी सोडण्याची मागणी केली होती . आम्ही दि . १ रोजी पाणी सोडण्याची मागणी केली असता , अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीचे कारण सांगितले . आम्हां ला निवडणूकां साठी राजकारण करायचे नाही , जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका ही एक वर्षे पुढे ढकलल्या आहेत . त्यासाठी हे आंदोलन नाही . कुकडी कालव्याचे पाणी जेवढे उशिरा येईल . तेवढे कांदा व इतर पिकांना त्याचा फटका बसणार आहे . आम्ही निघोज परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करत आहोत , त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत , हा मुख्य उद्देश आहे .
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर म्हणाले की , पाण्याचे रोटेशन हिवाळ्यात दोन व उन्हाळ्यात शेतीसाठी एक व पिण्याच्या पाण्यासाठी असे दोन,असे एकूण ४ पाण्याचे आवर्तन सोडले जाते . लिकेज थांबवण्यासाठी पाटाचे अस्तारी करण चालू आहे . त्याची खरी गरज होती का ? कांदा पिक जगावण्यासाठी ८ दिवस अगोदरच पाणी सोडायला हवे होते , पाणी उशिरा सोडल्यास कांदा पिक पुर्णपणे करपून जाईन . अशा वेळी त्या पाण्याचा काहीही उपयोग नाही . पालकमंत्री हेच जलसंपदा मंत्री आहेत , त्यांनी पाण्याची तारीख लांबवायला नको होती . पाणी प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा पाणी प्रश्न असून शेतकरी हा आशावादी आहे . या वर्षी कांदयाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे , पण कांदयाला योग्य भाव मिळत नाही . शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ यायला नको होती . पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्याने शेती मालाला पाणी देणे शक्य नाही . दि . ५ ला सोडलेले पाणी दि . ८ ला आपल्याला मिळेल . विहिरी भरण्यासाठी ५ दिवस लागतील , अशी खदखद ही सभापती रासकर यांनी व्यक्त केली .
यावेळी हभप पवन महाराज तनपुरे , अनंतराव वरखडे , दिलीप ढवण , बाळासाहेब लंके व इतरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले . यावेळी पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत लंके , शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख महेंद्र पांढरकर , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे सहसचिव विश्वासराव शेटे , धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पहिलवान सुभाष वराळ , दिलीप लाळगे , शांताराम लाळगे , दिगंबर लाळगे , भिवा रसाळ , भास्कर पठारे , हनुमंत रासकर , चेअरमन सुनिल वराळ , व्हाईस चेअरमन संतोष लामखडे , ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गुंड , शंकरराव वरखडे , व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या आंदोलनाचे सुत्रसंचालन पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी केले .
चौकट - पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डेरे म्हणाले की , या कुकडी कालव्या च्या पाण्यावर पारनेर तालुक्यातील साडे चौदा हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येते , पण प्रत्यक्षात निघोज परिसरातील साडे तीन हजार एकर क्षेत्रांसाठी पाण्याची मागणी आहे , या पाण्याचे नियोजन करण्यासाठी १५ पाणी वापर संस्था असून त्यातील फक्त ३ संस्थांनी पाणी पट्ट्या भरल्या . शेतकऱ्यांनी पाणी मागणी करा , पण त्यासाठी पाणी पट्टी ही वेळेवर भरा . त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मागण्याची गरज ही राहणार नाही , असे ही चेअरमन डेरे म्हणाले चौकट -
कुकड़ी कालव्या चे अधिकारी खाडे यांनी या शेतकऱ्यांच्या रस्ता रोको आंदोलना च्या संदर्भात दुरध्वनी वरून वरिष्ठांशी संपर्क साधला , त्यांना या आंदोलना ची माहिती दिली . व लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने हे रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!