By : Sangharshkranti Team ,2026-02-20
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
देशातील एकमेव अध्यात्मिक गाव म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे हुताशनी पौर्णिमेच्या अगोदर तब्बल १५ दिवस साजरा होणारा भट्टी (होळी) उत्सव बुधवारी पारंपरिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ५०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या होळी सोहळ्याला ग्रामस्थांसह भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
नाथांची शेजारती झाल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र येत कानिफनाथ मंदिरासमोर एकच सार्वजनिक होळी विधिवत पूजा करून रात्री नऊ वाजता पेटविण्यात आली. भट्टीची पूजा मढी देवस्थानचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सचिव माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, अनिल साठे, उषा मरकड, भाजपा युवा मोर्चाचे कुशल भापसे, माजी सरपंच भगवान मरकड, बाळासाहेब मरकड, बबन महाराज भिशे, प्रदीप पाखरे, शंकर पाखरे, विष्णू महाराज मरकड, राधाकिसन मरकड, भागेश मरकड, किरण मरकड, चंद्रभान पाखरे, बाळासाहेब मरकड, शामराव मरकड, डॉ. रमाकांत मरकड, ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे, संतोष मरकड, किरण मरकड, कार्यकारी आधिकारी अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातून सुमारे दोन टन गोवऱ्या वाजत-गाजत गडावर आणण्यात आल्या. सूर्यास्तापूर्वी भट्टी रचून रात्री तिचे प्रज्वलन करण्यात आले. सुमारे १५ फूट व्यासाचे वर्तुळ आणि दहा फूट उंचीची भव्य रचना करण्यात आली होती.
या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भट्टी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांनीच उभारण्यात आली असून लाकडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. पर्यावरणपूरक परंपरेचे जतन करत नाथ संप्रदायाची ही भव्य धूनी म्हणून भाविक या होळीचे दर्शन घेतात.
मढीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती तर गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. भट्टी पेटल्यानंतर भाविकांनी प्रदक्षिणा घालत नारळ अर्पण केले. हुताशनी पौर्णिमेला सार्वजनिक होळीचा मान गोपाळ समाजाला असून त्या दिवशी ग्रामस्थ स्वतंत्रपणे होळी साजरी करत नाहीत, ही येथील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानीफनाथांची संजीवन समाधी असून होळीपासून सुरू झालेली यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकजूट आणि पर्यावरणपूरक संदेश यांचा संगम असलेली मढीची भट्टी होळी राज्यभरातील भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस