श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

By : Sangharshkranti Team ,2026-03-03

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 3 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या आवर्तनामुळे खोडवा ऊस, गहू, उन्हाळी कांदा व फळबागांसाठी हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला जात आहे. घोड मधून एक मार्चपासून हे आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन 26 दिवसांसाठी असणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन मार्च रोजी दुपारी 375 क्युशेषने कालव्यात विसर्ग वाढवण्यात आला आहे. तीन मार्च रोजी साडेचारशे क्युसेसने विसर्ग आणखी वाढवणत येईल, अशी माहिती मढेवडगाव चे उपविभागीय अधिकारी टनके यांनी दिली. 

यावेळी पत्रकारांना अधिक माहिती देताना घोड सिंचन चे उपविभागीय अधिकारी  टणके यावेळी म्हणाले की,  उन्हाळी हंगामात जमिनीतील उपलब्ध साठ्याच्या बाष्पीभवनामुळे एक टीएमसी आवर्तनाची गरज असते. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करून शेती पिकांना लागेल तेवढेच पाणी घ्यावे. पाण्याचा अपव्य होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व उन्हाळी हंगामाची तीव्रता पाहता उन्हाळी हंगामाचे हे पहिलेच आवर्तन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. चालू वर्षी उन्हाची तीव्रता आत्तापासूनच जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके वाचली पाहिजे. यासाठी घोड सिंचन विभागाने शेतकऱ्यांसाठी या आवर्तनाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी देखील पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पुढील आवर्तनाला सामोरे जाण्यासाठी लागेल तेवढेच पिकांसाठी पाणी घ्यावे, म्हणजे पुढील हंगामाचे दुसरे  आवर्तन योग्य वेळी सोडण्यासाठी मदत होईल. जिथे पाण्याचा अपव्यय असेल तिथे तात्काळ घोडसिंचनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कारण पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. याबरोबरच मागील थकीत पाणीपट्टी वेळेत भरून पुढील आवर्तनाला विलंब होणार नाही. यासाठी देखील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन  उपविभागीय अधिकारी टनके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस