By : Sangharshkranti Team ,2026-03-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
पारनेर [ सौ . निलम खोसे पाटील यांजकडून ] - माळकूप येथे २५ वर्षांपासून स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत कार्यरत राहण्यासाठी श्री स्वामी भक्तांसाठी अत्यंत देखणे , नयनरम्य मंदीर लोकवर्गणी व लोकसहभागातून उभे राहिले आहे .
अतिशय प्रसिद्ध व लौकिक निर्माण करणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य करण्याची प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये व मनापासून ओढ असते , प्रत्येक स्वामीभक्त या संधीची वाट पाहत असतोच.. त्यांना प्रतीक्षा असते , नवीन संधी सेवेसाठी कधी व कशी मिळते याचीच.. मग ते देणगी स्वरूपात मदत करून किंवा अगदी मंदीर व परिसरातील स्वच्छता करून किंवा अन्नदान सेवेत सक्रिय होऊन सेवा कार्य करण्याचा आटोकट प्रयत्न करतात.
माळकूप येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान हे गत २५ वर्षापासून सेवा कार्यासाठी अतिशय प्रसिद्ध व लौकिक निर्माण करणारे देवस्थान ठरत आहे . गत ५ वर्षात जिर्णोद्धाराच्या माध्यमातून खूप आकर्षक स्वरूपात साकार झालं आहे.. मग मंदिराचा देखणा कळस असो किंवा मंदिराच्या परिसरातील स्वच्छता व मन प्रसन्न करणारे वातावरण , या सर्व गोष्टींनी येथे आज नगर , पुणे , मुंबई शहरातूनच किंवा गावातूनच नव्हे , तर राज्यातून स्वामीभक्त सेवेसाठी येत आहेत . दर गुरुवारी येथे महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम अखंड सुरू आहे . या कार्यक्रमासाठी नियमित अन्नदान सेवेचा कार्य स्वामीभक्त एकरूपपणे येऊन मनापासून करत आहे व यामुळेच या सेवेचा सुगंध दिवसेंदिवस दरवळत आहे . या सेवाकार्यात मंदिराचं रूपांतर देवस्थान मध्ये झाला आहे , येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येऊन सेवा करत करतात व महाआरती नंतर होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेतात . नियमित सर्व उत्सव चालीरीतीप्रमाणे परंपरानुसार होतात . प्रत्येक कार्यक्रमाला स्वामी भक्तांची होणारी अलोट गर्दी येथे दिवसेंदिवस वाढत आहे. श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व श्री दत्त जयंती मोठ्या उत्सवात व आनंदात साजरी केली जाते . यानिमित्त हे देवस्थान अक्षरशः श्री क्षेत्र अक्कलकोट स्वरूपात भाविकांना जाणवते . येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैतन्य प्रत्येक भक्त नेहमीच अनुभवतात . गुढीपाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन यंदाही मोठ्या भव्य दिव्य व विविध अध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमातून संपन्न होणार आहे . यासाठी देवस्थानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे प्रति वर्षाप्रमाणे आयोजन यंदाही करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्तांना सेवेची एक महापर्वणीच असते . यानिमित्त सप्ताह आयोजन केला जातो. सप्ताहाच्या प्रथम दिवशी ध्वज पूजन , कलश पूजन , दिशा पूजन करून श्री स्वामी समर्थ लीलामृत या ग्रंथाचे पारायण पारायण कर्ते सुरू करतात. सप्ताह भजन हरिपाठ , आरती हे कार्यक्रम नियमित सुरू असतात . प्रकट दिनाच्या दिवशी पहाटे युवा स्वामी सेवक कावडी घेऊन पाणी आणण्यासाठी जातात व कावडीच्या पाण्याने पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात येतो, नंतर षोडशोपचार पूजा व अभिषेक श्रीमूर्ती व पादुकांना केला जातो . वस्त्रालंकार सेवा अर्पण केली जाते यानंतर फलाहार अर्पण केला जातो. यानंतर श्री स्वामी समर्थ पालखी ग्रामोफेरीसाठी निघते व प्रदक्षिणा करून पुन्हा मंदीर स्थळी वाजत गाजत येते . या पालखी सोहळ्यात सर्व स्वामीभक्त आनंदाने सहभागी होतात .यानिमित्त टाळकरी , मृदुंग , वादक जयघोषात पालखीची मिरवणूक साजरी करतात. प्रकट दिनानिमित्त नामजप हवन साधना सिद्ध होते .पूर्णाहुती यज्ञात दिली जाते.
चौकट -
प्रकट दिनानिमित्त अन्नदान मोठ्या स्वरूपात करण्यात येते . याच पद्धतीने पहाटे ५ पासून रात्री १० पर्यंत विविध धार्मिक अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन यंदाही श्री स्वामी समर्थ देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे. स्वामी तिथे ,काय कमी या उक्ती नुसार खरोखर कधीही या कार्यक्रमाला कोणतीही अडचण येत नाही , कारण अशक्य ते , शक्य करतील स्वामी , याची प्रचिती येथे स्वामीभक्त नेहमीच घेतात. विविध स्तरातील स्वामीभक्त येथे अहंकार सोडून सेवेमध्ये तल्लीन होतात व मनापासून अंतकरणपूर्वक आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात आपले योगदान सदैव देत असतात . यंदाही या कार्यासाठी सेवेसाठी सेवेकरी पुढे राहतील यात शंका नाही.
तरी सर्व स्वामी भक्तांनी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी प्रकट दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून सेवेचा महाआरती महाप्रसादाचा निश्चित लाभ घ्यावा,असे आवाहन श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट माळकुप च्या वतीने करण्यात येत आहे. प्रकट दिनानिमित्त देवस्थान फुलांनी सुशोभित करण्या बरोबरच विद्युत रोषणाई केली जाणार आहे . भव्य मंडप व्यवस्था असेल व येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपली वाहने व्यवस्थित लावता यावी , यासाठी भव्य पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे , तरी भाविकांनी या सेवाकार्यात आपले अनमोल योगदान नक्की द्यावे व सेवाकार्याचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे अक्कलकोट प्रणित सेवा कार्य केले जाते . यामुळे भक्ती व प्रत्यक्ष स्वामी दर्शनाचा व नामजपाचा मोठा आनंद येथे स्वामी भक्तांना लाभत आहे. येथे आल्यावर अक्कलकोट येथे आलो आहे का?असे स्वामी भक्तांना नेहमीच वाटते , इथल्या कार्याची भुरळ स्वामीभक्तांना सेवेची मोठी पर्वणीच देत आहे.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस