सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

By : Sangharshkranti Team ,2026-02-18

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

मिरजगाव  येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव मध्ये आज क्रांतिवीर लहुजी वस्ताद आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त या दोन्ही क्रांतिवीर महामूर्तींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  आदरांजली व्यक्त केली गेली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर सर, समन्वयक राहुल म्हेत्रे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा. सचिन आढाव सर यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या जीवना विषयी माहिती सांगुन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीला उजाळा देत प्रत्येकाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे. आपल्याला इतिहासात अजरामर व्हायचे असेल तर इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. असे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस