श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

By : Sangharshkranti Team ,2026-03-03

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 3 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा - १ अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात ७ मार्च ते १३ मे २०२६ या कालावधीत मंडळस्तरावर एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केले आहे.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्काळ निकाली काढणे, तक्रारींचा सत्वर निपटारा करणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.तालुक्यातील विविध मंडळांसाठी पुढीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत :

दि. ७ मार्च २०२६ रोजी काष्टी मंडळासाठी राजयोग मंगल कार्यालय (काष्टी),

दि. १६ मार्च रोजी चिंभळा मंडळासाठी श्री हंगेश्वर मंदिर (हंगेवाडी),

दि. २० मार्च रोजी पेडगाव मंडळासाठी दत्त मंदिर सभागृह (पेडगाव),

दि. २७ मार्च रोजी आढळगाव मंडळासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान (आढळगाव),

दि. २ एप्रिल रोजी बेलवंडी बु. मंडळासाठी श्री छत्रपती विद्यालय हॉल (बेलवंडी बु.),

दि. १० एप्रिल रोजी देवदैठण मंडळासाठी महादेव मंदिर (देवदैठण),

दि. १७ एप्रिल रोजी लोणी व्यंकनाथ मंडळासाठी जिजाई मंगल कार्यालय (लोणी व्यंकनाथ),

दि. २१ एप्रिल रोजी मांडवगण मंडळासाठी श्री संत सावतामाळी मंदिर सभागृह (मांडवगण),

दि. २३ एप्रिल रोजी भानगाव मंडळासाठी श्री भानेश्वर (महादेव) मंदिर (भानगाव),

दि. ८ मे २०२६ रोजी श्रीगोंदा मंडळासाठी तुळशीदास मंगल कार्यालय (श्रीगोंदा) आणि

दि. १३ मे २०२६ रोजी कोळगाव मंडळासाठी सैनिक सांस्कृतिक भवन (वीर भवन), कोळगाव येथे शिबिरे पार पडतील.

या शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, तक्रारींचे निवारण तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह शिबिरांना उपस्थित राहावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!