By : Sangharshkranti Team ,2026-03-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन दि. ५ मार्चपासून सुरू होणार असून १४०० क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेते प्रा.राम शिंदे यांनी दिली.
या वेगाने पाणी सोडल्यामुळे कालव्यामधील सर्वच चाऱ्यांपर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचणार असून शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.
रब्बी पिकांना आधार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार
उन्हाळी आवर्तनामुळे रब्बी पिकांना आवश्यक असलेले पाणी वेळेत मिळणार आहे. मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून सुरू होणारे आवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या आवर्तनामुळे केवळ शेतीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. कर्जत तालुक्यातील तब्बल ५४ गावांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
ऊस, कांदा, डाळिंबासह फळबागांना नवसंजीवनी
या आवर्तनाचा फायदा ऊस, कांदा, मका, डाळिंब, केळी, पेरू आदी पिकांना होणार आहे. विशेषतः फळबागांसाठी उन्हाळ्यातील पाणी अत्यंत गरजेचे असते. योग्य वेळेत मिळणाऱ्या पाण्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध झाल्यास पिकांची वाढ, उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या उन्हाळी आवर्तनामुळे कर्जत तालुक्यातील शेतीला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!