बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

By : Sangharshkranti Team ,2026-02-18

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी  मुंबई येथे ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 च्या उदघाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली.

जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना आयोजित या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिक व्यापार, पुरवठा साखळी, ऊर्जा, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच बदलत्या भूराजकीय संरचनेच्या नव्या समीकरणांमध्ये भारत आज एक निर्णायक आणि प्रभावी इंजिन म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठ्या बाजारपेठेपासून विश्वासार्ह रणनीतिक भागीदारापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. G20 अध्यक्षपद, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, IMEC आर्थिक कॉरिडॉर आणि ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून भारताने नव्या जागतिक व्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावली आहे. 

महाराष्ट्राच्या भूमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र भारताच्या GDP मध्ये सुमारे 14-15% योगदान देते, औद्योगिक उत्पादनात जवळपास 20% वाटा उचलते आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांमार्फत 60% पेक्षा अधिक कंटेनर वहन हाताळते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून RBI, BSE, NSE, NPCI यांसारख्या प्रमुख संस्थांचे केंद्र आहे. भारत ही विकासाची प्रेरणादायी कहाणी असेल, तर महाराष्ट्र हा त्या विकासाचा आधारस्तंभ आहे.असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

IMEC, इंडो-पॅसिफिक समुद्री फ्रेमवर्क, वाढवण बंदर, जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि समर्पित मालवाहतूक मार्ग यांमुळे महाराष्ट्र जागतिक आर्थिक कॉरिडॉरचा पश्चिमेकडील अँकर बनण्यास सज्ज आहे. राज्यात EV, ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, संरक्षण उत्पादन, हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेमध्ये मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळत आहे.

शाश्वत पायाभूत सुविधा, ग्रीन बाँड्स, म्युनिसिपल बाँड्स आणि सार्वभौम निधी भागीदारीद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. आर्थिक सार्वभौमत्व म्हणजे आत्मनिर्भरतेसह सहकार्य, तसेच आम्ही टिकाऊ भागीदारी शोधत आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी फ्यूचर इकॉनॉमिक को-ऑपरेशन कौन्सिल चे कार्यकारी संचालक डॉ. विजय चौथाईवाले, भारत फोर्ज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या समवेत इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस