तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

By : Sangharshkranti Team ,2026-03-03

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 3 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा असं म्हटलं जातं की तरुण पिढीला आपल्या आजी-आजोबांसाठी वेळ नसतो..पण या समजुतीला छेद देत नातवंडांच्या अपार प्रेमाने आणि कृतज्ञतेने उजळलेला एक भावस्पर्शी सोहळा  अनुभवायला मिळाला. ज्या हातांनी संस्कार दिले, ज्या डोळ्यांनी पिढ्या घडताना पाहिल्या, त्या पूज्य व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी नातवंडांनी एकत्र येत उभा केलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला.

श्री.रुस्तुम फकीरबुवा महानुभाव (महानुभाव गुरुजी) यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित “कृतज्ञता सोहळा व जीवन गौरव समारंभ” हा कार्यक्रम राजमुद्रा लॉन्स्, रुईछत्तीशी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होताच सभागृहात भक्ती, आदर आणि कुटुंबीयांच्या प्रेमाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात आणि सनई वाद्यांच्या मंगल निनादात बाबांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यावेळी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून बाबांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. संपूर्ण सभागृह त्या क्षणी भावनांनी ओथंबून गेले होते.

यानंतर दीपप्रज्वलन आणि गोपाल कृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. या मंगलमय क्षणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक बाबांचे मोठे नातू वैभव संजय तांदळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी बाबांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त आढावा घेत उपस्थितांना कार्यक्रमाच्या भावविश्वात नेले.

त्यानंतर बाबांचा प्रेरणादायी जीवनप्रवास डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून स्क्रीनवर सादर करण्यात आला. या माहितीपटाने उपस्थितांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणले. साध्या परिस्थितीतून सुरू झालेला बाबांचा संघर्षमय प्रवास, शिक्षक म्हणून केलेली निष्ठावान सेवा आणि समाजासाठी दिलेले योगदान यांचे प्रभावी चित्रण या डॉक्युमेंट्रीत करण्यात आले होते. अनेकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाचे कौतुक केले.

यानंतर बाबांची कन्या अलका राजकुमार कारंजकर यांनी अत्यंत भावुक वातावरणात बाबांचे औक्षण केले. हा क्षण उपस्थितांसाठी विशेष हळवा ठरला. मुलीच्या हातून झालेल्या औक्षणाने सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. धार्मिक क्षेत्रातून  महंत हालसिकर बाबा (वाकी), महंत फाटे बाबा (शेंडी), महंत संतराज दादा धारशिवकर (मिरजगाव), राजधर दादा बिडकर (मांडवगण), तपस्विनी स्वाती ताई धाराशिवकर, तपस्विनी प्रतिभा ताई शेवलीकर, तपस्विनी मंगलताई धाराशिवकर, तपस्विनी अश्विनीताई बिडकर आणि तपस्विनी लताताई धाराशिवकर उपस्थित होते.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातून बाळासाहेब हराळ (जिल्हा परिषद सदस्य, वाळकी गट), रवी दादा भापकर (पंचायत समिती सदस्य), दादासाहेब दरेकर (भाजप तालुकाध्यक्ष), अभिलाष घिगे पाटील (सभापती, मार्केट कमिटी अहिल्यानगर), शांतीलाल कळमकर (सरपंच मठपिंपरी), सुभाष बोरकर (माजी सरपंच मठपिंपरी), संजय कदम (माजी सरपंच मठपिंपरी), पांडुरंग जाधव (माजी सरपंच हातवळण), ह. भ. प. बोरकर महाराज (मठपिंपरी), अशोक कामटे (मठपिंपरी), जालिंदर बोरुडे (नेत्रदूत फिनिक्स फाऊंडेशन), मेधाणी साहेब (राम एजन्सी), रावसाहेब शेळके (सरपंच गुणवडी), अरविंद कारंजकर (भाजप जिल्हा सचिव, अहिल्यानगर), रणशिंग वकील (कोयाळ) आणि साठे सर (नारायणडोह) पत्रकार उज्वला उल्हारे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.

तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, बाबांचे सहकारी आणि जिवलग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यामध्ये विशेषतः घोडके गुरुजी, विठ्ठल डोंगरे गुरुजी, तांबे गुरुजी, कराळे गुरुजी आणि घोडके बाई यांची उपस्थिती भावपूर्ण ठरली.

बाबांचे असंख्य विद्यार्थी देखील या सोहळ्यास उपस्थित होते. त्यामध्ये जयश्री ताई कारले (विस्तार अधिकारी, वांबोरी), हर्षवर्धन शेळके सर, श्रीपाद भागवत (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक), कुंडलिक लांडगे गुरुजी, रविकांत डोंगरे, विठ्ठल हांडे, जनाबाई शिंगोटे, नानाबाई कुंजीर, उल्हास मते, बबुशा डोंगरे, भिकाजी शिंगोटे, दादाभाऊ इंगळे, दत्तात्रय मते आदींसह पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

कार्यक्रमातील आणखी एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे बाबांची पणती श्रेया वैभव तांदळे हिने आपल्या पंजोबांबद्दल व्यक्त केलेले निरागस मनोगत. तिच्या निष्पाप शब्दांनी संपूर्ण सभागृह भावुक झाले.

बाबांचा हा भव्य कार्यक्रम त्यांच्या नातवंडांनी प्रेमपूर्वक आयोजित केला होता. आयोजनात वैभव संजय तांदळे (सुजय सेल्स, अहिल्यानगर), विशाल संजय तांदळे (एस. व्ही. कॉन्ट्रॅक्टर, अहिल्यानगर), राहुल राजकुमार कारंजकर (निर्मल सीड्स, पुणे), अक्षय मनोहर तांदळे (सहाय्यक अभियंता, सा. बा. विभाग, अहिल्यानगर), अजय सुनील तांदळे (महसूल अधिकारी, पुणे), अश्विनी मनोज महानुभाव (शिक्षिका, नाशिक विभाग), प्रिया सुनील बिडकर (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे), रुपाली रामकृष्ण नालकर (मॅनेजर, अहिल्या देवी होळकर पतसंस्था), भावना मनोज अंजनकर (मॅनेजिंग डायरेक्टर, पंच आयुकेअर, संगमनेर) आणि प्रतीक्षा बाबासाहेब ढोले (प्रोडक्शन इंजिनीयर, अहिल्यानगर) यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भावना मनोज अंजनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय मनोहर तांदळे यांनी मानले. बाबांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्रीचे लेखन भावना मनोज अंजनकर यांनी केले असून व्हिडिओ एडिटिंग विवेक ढोले यांनी केले.

एकूणच, कृतज्ञता, संस्कार आणि कुटुंबियांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. बाबांच्या कार्याला आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाला मानाचा मुजरा देणारा हा सोहळा पंचक्रोशी साठी अभिमानाचा क्षण ठरला.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस