शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

By : Sangharshkranti Team ,2026-03-04

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा : शिवाजीनगर परिसरात वाढती वर्दळ, बाहेरून येणाऱ्या तरुणांची संख्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता  स्थानिक रहिवाशांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यानुसार शिवाजीनगरमध्ये येणाऱ्या अनोळखी तरुण मुला-मुलींची आवश्यक ती चौकशी करण्यात येणार असून, भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास तसेच मोठा आवाज करणाऱ्या गाड्यांबाबत थेट पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात येणार आहे. यापुढे भाडेकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच बाहेरून येणाऱ्या तरुणांवर शिवाजीनगरमधील रहिवाशांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत शिवाजीनगर परिसरातील सर्व रूम चालक, अकॅडमी/क्लास संचालक व हॉस्टेल संचालकांसाठी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना रूम देताना किंवा क्लासमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड (झेरॉक्स प्रत), पालकांचे आधारकार्ड (झेरॉक्स प्रत), विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो तसेच पालकांचे पासपोर्ट साईज फोटो घेणे बंधनकारक राहील. याशिवाय रूम, हॉस्टेल व क्लासचे सर्व नियम आणि वेळेचे निर्बंध विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात स्वाक्षरीसह घेणे आवश्यक राहील. परिसरातील सर्व हॉस्टेल, क्लास व रूम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले असून ते कार्यान्वित स्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती आढळल्यास तत्काळ विचारपूस करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान आणि परिसरातील शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस नगरसेविका मीराताई शिंदे, नगरसेवक प्रशांत गोरे, विनायक ससाने सर, बाळासाहेब दुतारे, लाटे-औटी मॅडम, पारे सर, खरसडे सर, सुभाष आढाव आदी सोसायटी मंडळ  तसेच शिवाजीनगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या या एकजुटीमुळे शिवाजीनगर परिसर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस